ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल' चित्रपटासाठी रणबीर कपूरनं वाढवलं 11 किलो वजन, पाहा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन - बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

Animal movie : अभिनेता रणबीर कपूरनं 'अ‍ॅनिमल'साठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करण्यात खूप मेहनत घेतली आहे. आता रणबीरचे काही फोटो आणि व्हिडिओ फिटनेस कोच शिवोहमनं शेअर केले आहेत.

Animal movie
अ‍ॅनिमल चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 2:57 PM IST

मुंबई - Animal movie : अभिनेता रणबीर कपूर रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल यांचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत. या चित्रपटानं चार दिवसांत जबरदस्त कमाई करून अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. 'अ‍ॅनिमल' हा या वर्षातील सर्वात जास्त कमाई करणार चित्रपट ठरेल असं सध्या दिसत आहे. या चित्रपटांचे शो सातत्यानं हाऊसफुल्ल होत आहेत. हा चित्रपट हिट होण्याचे श्रेय रणबीर कपूरच्या अभिनयाला आणि त्याच्या लुक्सला जाते. या चित्रपटात रणबीरनं लांब केस आणि दाढीसह आपला दमदार लूक रुपेरी पडद्यावर चाहत्यांना दाखवला आहे.

'अ‍ॅनिमल' चित्रपटासाठी केलं ट्रान्सफॉर्मेशन : रणबीरनं आपल्या अभिनयासोबतचं त्याच्या बॉडीवर देखील काम केलं आहे. रणबीरच्या ट्रान्सफॉर्मेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसापूर्वी रणबीरचा 'तू झुठी मैं मकर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो सडपातळ होता. मात्र तो 'अ‍ॅनिमल'मध्ये खूपच दणकट दिसत आहे. काही दिवसांतच रणबीरचे हे अप्रतिम बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. रणबीर कपूरनं त्याची बॉडी 'अ‍ॅनिमल'साठी कशी तयार केली आहे, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल व्यतिरिक्त अनिल कपूर, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, प्रेम चोप्रा आणि तृप्ती डिमरी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे.

'अ‍ॅनिमल'साठी रणबीरनं वाढवलं ​​11 किलो वजन : रणबीर कपूरचे फिटनेस कोच शिवोहमनं अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये रणबीरनं हे पात्र साकारण्यासाठी खूप घाम गाळलाचं दिसत आहे. यासोबतच शिवोहमनं रणबीर कपूरच्या शेड्युलबद्दलही लिहिलं आहे. शिवोहमनं सर्वात आधी रणबीर कपूरच्या दोन फोटोंचा कोलाज शेअर केले आहे, ज्यामध्ये रणबीरचा 'तू झुठी मैं मक्कर'मधील फर्स्ट लूक दिसत आहे. यावेळी त्याचं वजन 71 किलो होते. दुसरा फोटो रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' लूकचा आहे, ज्यामध्ये त्याचं वजन 11 किलो वाढून 82 किलो झाले आहे. या कोलाजसह शिवोहमनं लिहिलं , 'हे सर्व 2021 मध्ये सुरू झाले, जेव्हा आम्ही लव रंजनच्या 'तू झुठी में मक्कर'साठी बीच बॉडी लूकची तयारी सुरू केली. त्यानंतर आम्ही 2022 मध्ये संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची तयारी सुरू केली. याशिवाय शिवोहमनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रणबीरचा 'अ‍ॅनिमल' सेटवरील वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खूप मेहनत करताना दिसत आहे. या व्हिडिओवर शिवोहमनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'शांतपणे काम करा, जेणेकरून तुमच्या यशाचा आवाज येईल.' रणबीरच्या या मेहनतीनं आता बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे.

हेही वाचा :

  1. अजय देवगण आणि तब्बू यांच्या 'औरों में कहाँ दम था' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
  2. 'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पाचव्या दिवशी करणार 'इतकी' कमाई
  3. राखी सावंतनं अब्रुनुकसानीचा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात घेतली धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.