मुंबई - बॉलिवूड स्टार रणबीर कपूर एका कार्यक्रमात स्वत:वर गरमागरम कॉफी टाकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. शुक्रवारी संध्याकाळी, ब्रह्मास्त्र स्टार रणबीर, त्याची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांच्यासमवेत एका पुस्तकाच्या लाँचमध्ये गेला होता. हातात गरम पेयाचा कप घेऊन रणबीर स्टेजवर प्रेक्षकांशी संवाद साधत होता. चर्चेत असताना रणबीरचा कपवरील ताबा सुटला आणि तो कप त्याच्या ट्राउझर्सवर सांडला.
रणबीर कपूर बनला असाह्य - व्हिडिओमध्ये, रणबीरने त्याच्या पॅंटवर गरम कॉफी पडल्यानंतर झटपट उडी मारताना दिसत आहे. रणबीर कपूर असाह्य होऊन काहीही करू शकला नाही, परंतु लगेचच मदत मागवण्यात आली. रणबीरसाठी झालेला प्रकार अनपेक्षित होता. उपस्थित लोकांनीही याचे आश्चर्य वाटले. कोणीही जाणीवपूर्व ही चूक केलेली नसली तरी गडबडीच्या प्रसंगी असे प्रसंग ओढवू शकतात याची कल्पना सर्वांनाच आली रणबीर आणि त्याची आई एका स्किनकेअर पुस्तकाच्या प्रमोशनसाठी एकत्र आले होते. रणबीर काळ्या रंगाच्या पोशाखात दिसला तर नीतू जांभळ्या रंगाच्या पोशाखात भव्य दिसत होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अॅनिमलच्या शुटिंगमध्ये रणबीर बिझी - अभिनेता रणबीर कपूर अलीकडेच त्याचा आगामी चित्रपट अॅनिमलच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो चित्रपटाच्या व्याप्तीच्या भव्यतेचे संकेत देतात. अॅनिमलचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी 1 जानेवारी रोजी चित्रपटाचे पोस्टर ट्विट केले. रणबीर कपूर सिगारेट ओढत असताना कोणाकडे तरी पाहत आहे. त्याने रक्ताने माखलेली कुऱ्हाड हाती धरलेली दिसत आहे आणि त्याचा पांढरा शर्ट रक्ताने माखलेला आहे. पोस्टरसोबतच चित्रपटाची रिलीज डेट (11 ऑगस्ट) देखील समोर आली आहे. संदीप रेड्डी वंगा याच्या या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती दिमरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
तू झूठ मैं मक्कार हा रणबीर कपूरचा अलिकडे रिलीज झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर २०० कोटीच्या क्लबमध्ये पोहोचला होता. चित्रपटाने एकून २०४ कोटींची कमाई केली. ब्रम्हास्त्रला मिलालेल्या उत्तम यशानंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा कमाल करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला.
हेही वाचा - Ponniyin Selvan 2 Box Office Collection: मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन 2 ची पहिल्या दिवशी दमदार कमाई