ETV Bharat / entertainment

Ranbir kapoor : टॉक्सिक पुरुष म्हणून ट्रोल करणाऱ्यांना रणबीर कपूरनं दिलं संयमानं उत्तर - टॉक्सिक पुरुष

Ranbir kapoor : अलीकडेच, आलिया भट्टनं व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की, रणबीरला तिचे लिपस्टिक लावणे आवडत नाही, ज्यामुळे लोक सोशल मीडियावर रणबीरला टॉक्सिक पुरुष म्हणत ट्रोल करत होते. आता नुकताच याबाबत रणबीरनं मौन सोडलं आहे.

Ranbir kapoor
रणबीर कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 1:08 PM IST

मुंबई - Ranbir kapoor : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बी-टाऊनची लोकप्रिय जोडी आहे. या दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी खूप खास केमिस्ट्री पाहायला मिळते. अलीकडेच आलियानं दिलेल्या एका वक्तव्यामुळं रणबीर हा ट्रोल झाला होता. आलिया भट्टनं एका आठवड्यांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिनं सांगितलं होतं की, पती रणबीरला तिचं लिपस्टिक लावणं आवडत नाही. जेव्हा ती लिपस्टिक लावते, तेव्हा रणबीर तिला पुसण्यास सांगते. रणबीरबद्दलचा हा खुलासा झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळी उडाली. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकजण त्याला ट्रोल करू लागले होते.

  • i am on the side of the people who are fighting for the toxic masculinity, if they use me as the face of it, it's fine because their fight is bigger than just me feeling bad about them having an opinion about what i said
    What a man you're #RanbirKapoor
    pic.twitter.com/Gs3lOiDV6x

    — 𝙑amsi ♪ (@RKs_Tilllast) October 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रणबीर कपूरनं दिली प्रतिक्रिया : लोकांनी रणबीरला ही अट आलियावर लादल्याबद्दल सुनावले होत. रणबीरनं अखेर या प्रकरणावर आपलं मौन तोडलं असून तो पुन्हा एकदा या वक्तव्यानं चर्चेत आला आहे. रणबीर कपूरला आलियाच्या ओठांचा नैसर्गिक रंग आवडतो, यामुळे त्याला अनेकजणांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. रणबीर आलियाशी कठोर वागत असल्याचा आरोप ट्रोल्सनं केला होता. आता रणबीरनं या मुद्द्यावर आपले मौन तोडत म्हटलं, विकृत पुरुषाच्या वृत्तीच्या विरोधात लढणाऱ्यांच्या बाजूनं तो आहे. त्यानं म्हटलं, 'कधीकधी एक अभिनेता म्हणून तुमच्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या जातात, अनेक मते तयार होतात, जी खरी असतीलच असे नाही. माझी ही प्रतिमा, जी चित्रपटातून किंवा मी साकारलेली पात्रे आणि माध्यमांतून निर्माण झाली आहे, ती माझी स्वतःची नाही. मी तसा नाही. ही प्रतिमा सार्वजनिक आहे. याचे मालक लोक आहेत. मी एक अभिनेता म्हणून स्वत:ला सिद्ध करू शकतो. एक अभिनेता आणि माझे लक्ष नेहमीच अभिनयावर असते.

  • alia bhatt said in the vogue video that ranbir kapoor hated her with lipstick so he’d ask her to wipe it off???? If your partner is telling you to wipe your lipstick that the biggest sign for you to run! It is not cute or funny at all!
    I’m like scared for her, everytime she is on… pic.twitter.com/3VtXd8fnpw

    — Janhavi Jain (@janwhyy) August 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

टॉक्सिक पुरुष : आलियाच्या लिपस्टिक व्हिडिओवर रणबीर पुढे म्हटलं, 'अलिकडेच मी एक लेख वाचला ज्यामध्ये मी टॉक्सिक आहे, असं म्हटलं होतं. हा लेख मी दिलेल्या विधानाशी संबंधित होता. टॉक्सिक पुरुषत्वाविरुद्ध लढणाऱ्यांच्या मी पाठीशी आहे. जर त्यांना माझा चेहरा टॉक्सिक म्हणून वापरायचा असेल तर ते ठीक आहे. मला वाईट वाटण्यापेक्षा त्यांचा लढा मोठा असल्याचा मी मानतो, मला याबद्दल त्रास होत नाही. रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार असून, यात रणबीर व्यतिरिक्त बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा :

  1. Shraddha Kapoor bought Lamborghini : दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धा कपूरनं स्वतःला दिली लाल रंगाची लॅम्बोर्गिनी भेट
  2. Vinayakan :'जेलर' फेम खलनायक वर्मनची भूमिका साकारलेल्या विनायकनची जामिनावर सुटका
  3. Dussehra 2023: कंगना रणौतनं केलं ऐतिहासिक लाल किल्ल्यावरील रावण दहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.