मुंबई : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या बहुप्रतीक्षित रोमँटिक चित्रपटाचा प्रीमियर मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग हे मुख्य भूमिकेत आहेत. रणबीर कपूर पत्नी आलियाच्या आगामी चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी या कार्यक्रमात सहभाग झाला होता. दरम्यान रणवीर सिंग या कार्यक्रमात पत्नी दीपिका पदुकोणशिवाय उपस्थित असल्यानंतर रणवीर सिंग, दीपिका पदुकोण यांच्यात सर्व काही ठीक आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' प्रीमियर इव्हेंट : या चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये आलिया आणि रणबीर 'टीम रॉकी और रानी' असे लिहिलेल्या काळ्या टी-शर्टमध्ये एकत्र दिसले. तसेच आलियाने काळ्या टी-शर्टसोबत फेडेड जीन्स आणि ब्लॅक हिल्स घातली होती. दरम्यान यावेळी रणबीरने काळ्या टी-शर्टवर काळ्या पॅन्टसह पांढरे शूज घातले होते. रणवीर सिंग देखील प्रीमियरमध्ये पांढऱ्या टी-शर्ट आणि एक अतरंगी पॅन्टमध्ये यावेळी दिसला.
रणवीरच्या चाहत्यांना पडला प्रश्न : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या प्रीमियरमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र या इव्हेंटमध्ये दीपिका पदुकोण अनुपस्थित असल्याने अनेकांनी सोशल मीडियावर रणवीरला प्रश्न विचारला आहे. या पोस्टवर रणवीरच्या एका चाहत्यांने विचारे, 'दीपिका सपोर्ट करायला आली नाही?' दुसऱ्याने एकाने विचारले, 'दीपिका कुठे आहे? तुम्ही ठीक आहात का??' अशा अनेक प्रकारच्या कमेंट या पोस्टवर येत आहेत.
प्रीमियरमध्ये बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी : दरम्यान, दीपिका सोमवारी मुंबई विमानतळावर दिसली होती त्यामुळे ती शहरात नसल्याचा अंदाज बांधला जात आहे. प्रीमियरला उपस्थित असलेल्या इतर सेलिब्रिटींमध्ये जया बच्चन, अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन, कतरिना कैफ, विक्की कौशल, मलायका अरोरा, अनन्या पांडे आणि सारा अली खान यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा :