मुंबई - Animal Movie Trailer: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'अॅनिमल' चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी अनेकजण उत्सुक आहे. 'अॅनिमल' चित्रपटाद्वारे पहिल्यादांच रणबीर आणि रश्मिका रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दरम्यान आज 23 नोव्हेंबर रोजी 'अॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर चाहत्यांना खूप पसंत पडलाय. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र मिळालंय. त्यामुळे हा चित्रपट प्रौढ श्रेणीतील आहे. अॅनिमल चित्रपटाचा रनटाइम 3 तास 2 मिनिटांचा असेल. चित्रपटाचा 3 मिनिटे 32 सेकंदचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अॅनिमल होणार 'या' दिवशी प्रदर्शित : 'अॅनिमल'च्या ट्रेलरला उत्कृष्ट रेटिंग दिली जातेय. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. 'अॅनिमल' चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलंय. त्यांनी यापूर्वी शाहिद कपूरसोबत कबीर सिंग हा चित्रपट बनवला होता. 'अॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर आज दुपारी 1.30 दिल्लीतून प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. 'अॅनिमल'मध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, परिणीती चोप्रा, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा, सौरभ सचदेवा, सुरेश ओबेरॉय, सौरभ शुक्ला आणि इतर कलाकार दिसणार आहेत.
'अॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर : 'अॅनिमल’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणबीरचा एक वेगळा लूक पाहायला मिळत आहे. त्याचं त्याच्या वडिलांवर म्हणजेच अनिल कपूरवर प्रचंड प्रेम असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. अनिल कपूर हा प्रसिद्ध उद्योगपती असतो आणि रणबीर हा या चित्रपटात गँगस्टर दाखवण्यात आलाय. अनिल कपूरवर कोणी तरी गोळी चालतो. त्याचा शोध रणबीर घेत असतो. ट्रेलरमध्ये रणबीर अॅक्शन मोडमध्ये आहे. ट्रेलरच्या शेवटी रणबीर आणि बॉबी यांच्यामध्ये फायटिंग सीन अंगावर शाहरे आणतो. या चित्रपटामध्ये बॉबी खलनायकाची भूमिका सकारतोय.
हेही वाच :