मुंबई: अभिनेता रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) आणि आलिया भट्टच्या ( Alia Bhatt ) लग्नाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी आणि आई नीतू कपूर यांनी या जोडप्याच्या मेहंदी सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर, मीडियाशी बोलताना लग्नाच्या तारखेबद्दल माहिती दिली आहे.
-
Ranbir Kapoor, Alia Bhatt to tie the knot on Baisakhi, confirms Riddhima Kapoor Sahni
— ANI Digital (@ani_digital) April 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/x9PmIvZ36E#RiddhimaKapoorSahni #NeetuKapoor #AliaBhatt #RanbirKapoor #AliaRanbirwedding #RanAlia #Ralia #AliaBhattRanbirKapoorwedding pic.twitter.com/Jxqr2ou46m
">Ranbir Kapoor, Alia Bhatt to tie the knot on Baisakhi, confirms Riddhima Kapoor Sahni
— ANI Digital (@ani_digital) April 13, 2022
Read @ANI Story | https://t.co/x9PmIvZ36E#RiddhimaKapoorSahni #NeetuKapoor #AliaBhatt #RanbirKapoor #AliaRanbirwedding #RanAlia #Ralia #AliaBhattRanbirKapoorwedding pic.twitter.com/Jxqr2ou46mRanbir Kapoor, Alia Bhatt to tie the knot on Baisakhi, confirms Riddhima Kapoor Sahni
— ANI Digital (@ani_digital) April 13, 2022
Read @ANI Story | https://t.co/x9PmIvZ36E#RiddhimaKapoorSahni #NeetuKapoor #AliaBhatt #RanbirKapoor #AliaRanbirwedding #RanAlia #Ralia #AliaBhattRanbirKapoorwedding pic.twitter.com/Jxqr2ou46m
रणबीरची बहीण रिद्धिमा कपूरने दिलेल्या ( Ranbir's sister Riddhima Kapoor ) माहितीनुसार, लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गुरुवारी बैसाखीच्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकणार आहेत. रिद्धिमा कपूर म्हणाली, "उद्या (गुरुवारी) रणबीरच्या वांद्रे येथील निवासस्थानी लग्न आहे." ही माहिती देताना रिद्धिमा आणि नीतू, त्यांच्या चेहऱ्यावर मोठे हास्य होते.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचा सोहळा ( Ranbir-Alia's wedding ceremony ) अखेर आजपासून सुरू झाला आहे. रणबीरची चुलत बहीण करीना कपूर खान, करिश्मा कपूर, आत्या रिमा जैन (दिवंगत ऋषी कपूर यांची बहीण) आणि चुलत बहीण निताशा नंदा (रितू आणि राजन नंदा यांची मुलगी) हे विवाहासाठी आले होते. वांद्रे येथील रणबीरच्या निवासस्थानी येताना कुटुंबातील सदस्य आणि मित्र पारंपारिक पोशाखात दिसत होते.
रिद्धिमा आणि नीतू आलिया भट्टबद्दल बोलताना म्हणाल्या, "आलिया खुप क्यूट आणि गोंडस आहे."
-
Amitabh Bachchan extends heartfelt greetings to Ranbir Kapoor, Alia Bhatt
— ANI Digital (@ani_digital) April 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/2A1O3VeEPh#AmitabhBachchan #Brahmastra #RanbirKapoor #AliaBhatt #RanAlia #RanbirKapoorAliaBhattWedding pic.twitter.com/klbJdUwJsw
">Amitabh Bachchan extends heartfelt greetings to Ranbir Kapoor, Alia Bhatt
— ANI Digital (@ani_digital) April 13, 2022
Read @ANI Story | https://t.co/2A1O3VeEPh#AmitabhBachchan #Brahmastra #RanbirKapoor #AliaBhatt #RanAlia #RanbirKapoorAliaBhattWedding pic.twitter.com/klbJdUwJswAmitabh Bachchan extends heartfelt greetings to Ranbir Kapoor, Alia Bhatt
— ANI Digital (@ani_digital) April 13, 2022
Read @ANI Story | https://t.co/2A1O3VeEPh#AmitabhBachchan #Brahmastra #RanbirKapoor #AliaBhatt #RanAlia #RanbirKapoorAliaBhattWedding pic.twitter.com/klbJdUwJsw
हा लग्नसोहळा चार दिवस रणबीर कपूरच्या घरी चालणार आहे. आजपासून हा विवाहसोहळा सुरू झाला आहे. दोघे 14 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या तपशीलांबद्दल काहीही बोललेले नव्हते, मात्र सोमवारी रणबीरच्या घरी एक कार दिसली आणि ती वरवर पाहता वधूसाठीच्या पोशाखांनी भरलेली होती. आलिया आणि रणबीरने त्यांच्या आगामी अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्रच्या सेटवर डेटिंग करण्यास सुरुवात केली होती. दोघांचा हा पहिलाच एकत्रीत चित्रपट असणार आहे.
हेही वााचा - रणबीर आलिया विवाह : करिश्मा, करीनासह दिग्गज वऱ्हाडींचे आगमन