मुंबई - Ranbir Kapoor Christmas : 'अॅनिमल'मधील अभिनयामुळे प्रसिद्धी मिळवत असलेला अभिनेता रणबीर कपूर त्याच्या एका कृत्यामुळे अडचणीत आला आहे. त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रणबीरवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. हे प्रकरण ख्रिसमसच्या सेलेब्रिशनशी संबंधित आहे. अलिकडेच रणबीरने आपल्या कुटुंबासोबत घरीच ख्रिसमस साजरा केला. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रणबीर केकवर दारू ओततल्यानंतर ती पेटवताना आणि नंतर 'जय माता दी' म्हणताना दिसतो.
व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सनी रणबीर कपूरला ट्रोल करण्यास सुरू केलं. आता त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रणबीर कपूर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील संजय तिवारी यांनी ही तक्रार केली असून त्यांनी तक्रारीत असा दावा केला आहे की व्हिडिओमध्ये रणबीर कपूर केकवर दारू ओतत आहे आणि तो जाळताना 'जय माता दी' म्हणत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओची ईटीव्ही भारत कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही.
काय आहे रणबीर कपूर विरुद्ध तक्रार?
धर्मानुसार कोणतंही शुभ कार्य आरंभ करताना अग्निदेवतेची पूजा केली जाते. मात्र यासाठी रणबीरनं दारुसारख्या अवित्र गोष्टीचा वापर केला. त्यामुळे त्यानं तमाम समुहाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. दारू ओतून आणि पेटवून दिल्यानंतर रणबीरने 'जय माता दी'चा जप करताच कुटुंबातील इतर सदस्यांनीही तोच जप मागे केला. या सर्वांनी धर्मात निषिद्ध असलेल्या दारूसारख्या पदार्थाचा वापर करून जाणीवपूर्वक 'जय माता दी'चा जप केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रार दाखल करण्यासोबतच वकिलाने रणबीर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध आयपीसीच्या कलम २९५, ५०९ आणि ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
कपूर ख्रिसमस सेलेब्रिशन
बॉलिवूडमध्ये कपूर खानदानात होणारा ख्रिसमसचा सण नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिलेला आहे. यावेळी संपूर्ण परिवार एकत्र येतो आणि हा दिवस आनंदाने साजरा करतो. या गेट टुगेदरची परंपरा जपत यावर्षी ख्रसमस पार्टीत कपूर फॅमिलीचे सर्व सदस्य एकत्र आले होते. नेहमीच्या उत्साहात पार्टीला सुरुवात करण्यापूर्वी केक कापण्याचा कार्यक्रम पार पडला. यंदाचा वर्षाखेरीस रणबीरच्या 'अॅनिमल'नं घवघवीत यश मिळवल्यानं अर्थात केक त्याच्या हस्ते कापण्यात आला. त्यापूर्वी केकवर दारु ओतून ती पेटवण्यात आली. अशावेळी त्याच्या तोंडून जय माता दीचा उल्लेख झाला आणि हीच गोष्ट त्याच्या अडचणीचे कारण ठरली आहे.
हेही वाचा -
2. 'डंकी'मधील 'मैं तेरा रास्ता देखूंगा' हे हृदयस्पर्शी गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ
3. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने निर्मित 'पंचक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित