मुंबई : रामायण या महाकाव्यावर ‘आदिपुरुष’ चित्रपट बनवून निर्मात्यांनी रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. 'रामायणा'सारखा साधेपणा आणि सभ्यता 'आदिपुरुष'मध्ये कुठेही दिसत नाही, त्यामुळेच आजच्या पिढीमध्ये 'रामायण'चे चुकीचे रूप 'आदिपुरुष' मधून मांडले गेले आहे. आता या श्रद्धेशी संबंधित लोकांमध्ये 'रामायण' पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि 'आदिपुरुष' सारखी वाईट निर्मिती त्यांच्या मनातून काढून टाकण्यासाठी, एका वाहिनीने रामायण पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या रामानंद सागर यांचे रामायण कधी आणि कुठे प्रसारित होणार आहे.
रामायण कधी आणि कुठे प्रसारित होणार? : 'आदिपुरुष'वरून देशभरात पसरलेल्या संतापामुळे चित्रपट दुभंगला आहे. या चित्रपटात राम ते रावणाचे रूप आणि त्याच्या व्यक्तिरेखेचे वर्णन अतिशय वाईट पद्धतीने मांडण्यात आली आहे. या चित्रपटाबाबत देशभरात निदर्शने होत आहेत. १२ दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर थंडावला असून कोणीही चित्रपट पाहण्याच्या तयारी करत नाही. रामायणातही राम (अरुण गोविल), लक्ष्मण (सुनील लाहिरी) आणि सीता (दीपिका चिखलिया) यांनी आदिपुरुष या चित्रपटाची निर्मिती ही कुरूप असल्याचे म्हटले आहे. लोकांच्या हृदयात घर केलेल्या या स्टार्सनी आजपर्यंत प्रभू रामाच्या नावाने ‘आदिपुरुष’सारखी स्वस्त निर्मिती पाहिली नसल्याचे सांगितले. या चित्रपटाबाबत देशाच्या अनेक भागातून विरोध झाला आहे. चित्रपटावर बंदी आणावी असे अनेकांनी सोशल मीडियाद्वारे म्हटले होते. तसेच अनेक लोकांनी चित्रपट निर्मात्यांना वाईट निर्मितीबद्दल शिव्या देखील दिल्या होत्या.
'आदिपुरुष' चित्रपटाचे निर्माते कायदेशीर कचाट्यात अडकले : अशा परिस्थितीत शेमारू टीव्हीने घोषणा केली आहे की ते रामानंद सागर यांचे रामायण ३ जुलैपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित करणार आहेत. सध्याला 'आदिपुरुष' चित्रपटाचे निर्माते कायदेशीर कचाट्यात अडकले असून न्यायालयाच्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. ५०० कोटीने बनलेला आदिपुरुष हा चित्रपट ५०० कोटीचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार करणार की नाही यावर देखील शंका निर्माण होत आहे. मेगा बिग बजट हा चित्रपट रूपेरी पडद्यावर फ्लॉप होईल का हे येणाऱ्या काळात कळणार, मात्र सध्याला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार संघर्ष करताना दिसत आहे.
हेही वाचा :