मुंबई - शर्लिन चोप्रा प्रकरणी राखी सावंतला आंबोली पोलिसांनी गुरुवारी (19 जानेवारी) अटक केली आहे. खुद्द शर्लिननेच ट्विट करून ही माहिती दिली आहे. राखीने तिचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप शर्लिनने केला आहे. या प्रकरणी शर्लिनने गेल्या वर्षी राखीविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता यावर राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याने शर्लिनवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. राखी सावंतच्या भावाचे म्हणणे आहे की, त्याच्या बहिणीने कोणताही मोठा गुन्हा केलेला नाही, त्यामुळे त्याला त्याची चिंता नाही.
पोलिसांनी बोलावले असता राखी सावंत का जाऊ शकली नाही? - मीडियाला दिलेल्या मुलाखतीत राकेश सावंतचा भाऊ राकेश सावंत म्हणाला, 'पोलिसांनी सांगितलेल्या वेळी राखीला पोलिस स्टेशनला जाता आले नाही म्हणून अटक करण्यात आली आहे. राखीच्या भावाने पुढे म्हटले आहे, ही शर्लिन आणि राखीची वैयक्तिक बाब होती, त्यावरुन हा सगळा वाद आहे, बहुधा राखीला पोलिसांनी बोलावले होते पण आईची तब्येत बिघडल्याने ती जाऊ शकली नाही.
राखीच्या भावाचे शार्लिनला आव्हान - राकेश सध्या त्याच्या आजारी आईसोबत आहे. राकेशने सांगितले की राखीसोबत कुटुंब, वकील आणि तिचा पती आदिल खान आहे. राकेशने बहीण राखीला 'महाराष्ट्राची जान' म्हटले आहे. शर्लिनवर बोलताना राकेश म्हणाला, 'शर्लिन तू बाहेरून आली आहेस, इथे काय जन्माला आली आहेस का? आमच्या इतकी तुझी लायकी आहे का? इंडस्ट्रीत येणार्या मुलांवर याचा काय परिणाम होईल.
राखी सावंतला का अटक करण्यात आली? - गेल्या वर्षी शर्लिन चोप्राने राखी सावंतविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यामुळे राखी सावंतवर आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. शर्लिनने तिच्या तक्रारीत पोलिसांना सांगितले होते की, राखीने पत्रकार परिषदेत तिचा (शर्लिन चोप्रा) आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला होता आणि तिच्यासाठी अपशब्द वापरले होते.
राखी सावंत विवाहामुळे आली चर्चेत - ड्रामा क्विन राखी सावंतचा प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत विवाह झाला आहे. सोमवारी आदिल खानने लग्न अधिकृत असल्याचा खुलासा केला आहे. राखी सावंतने सार्वजनिक ठिकाणी हौशी फोटोग्राफर्स समोर रडण्याचा ड्रामा केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यापार्श्वभूमीवर आदिलचा हा खुलासा समोर आला होता. यापूर्वी, राखीने एक इंस्टाग्राम रील व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती आदिलला हार घालताना दिसली होती. तिच्या प्रियकरासह तिचा एक व्हिडिओ पुन्हा शेअर केला होता. एक काझी समारंभाचे संचालन करत असल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये राखीने हलका-गुलाबी रंगाचा शरारा परिधान केला होता, तर आदिल कॅज्युअल वेअर, ब्लॅक टी आणि ब्लू डेनिम परिधान केला होता.
राखी सावंतने स्वीकारला इस्लाम, नावातही केला बदल - फिल्मी जगतातील सर्वात वादग्रस्त, ड्रामा क्वीन राखी सावंतने प्रियकर आदिल दुर्राणीसोबत लग्न करून आपला नवीन मुक्काम निश्चित केला आहे. दोघेही बराच काळ एकत्र होते. 24 तास प्रकाशझोतात राहिल्यानंतरही राखीने आदिलसोबत गुपचूप लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. गेल्या काही दिवसांपासून राखी, आदिलच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ पुरावा म्हणून सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
हेही वाचा - Rakhi Sawant Police Inquiry : मुंबई पोलिसांकडून अभिनेत्री राखी सावंतची चौकशी; वाचा, काय आहे प्रकरण