ETV Bharat / entertainment

Rakhi Sawant : टोमॅटोच्या महागाईत राखी सावंतने योगी आदित्यनाथकडे केली अशी मागणी... वाचा - बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंत

प्रसिद्धीच्या झोतात असलेली बॉलिवूड ड्रामा क्वीन राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख करताना दिसत आहे. चला तर मग पाहूया राखीचा हा नवीन व्हिडिओ...

Rakhi Sawant
राखी सावंत
author img

By

Published : Jul 19, 2023, 7:02 PM IST

मुंबई : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत तिच्या ड्रामा आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. राखीचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राखीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये राखी मत मागताना दिसली आहे. हा व्हिडिओ तिने बुधवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी पापाराझीला सांगते की, ती सीएम योगींची खूप मोठी फॅन आहे. पुढे तिने सांगितले की, योगी जी, २०२४ मध्ये येणाऱ्या निवडणुकीत टोमॅटो चिन्ह घेतले पाहिजे याशिवाय मला निवडणूकीत उभे करायला पाहिजे. आपण घराघरात टोमॅटो वाटप करू त्यामुळे आपल्याला खूप मते मिळतील, मग कोणाला नोट वाटण्याची गरज नाही, असे तिने म्हटले.

व्हिडिओत कशी दिसत आहे राखी : व्हिडीओमध्ये राखी लाल रंगाच्या ऍथलीजरमध्ये दिसत आहे. तसेच तिने आपले या लूकमध्ये केस खुले ठेवले आहेत. यावर तिने हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे. राखीने तिच्या लाल लुकची तुलना एका महागड्या टोमॅटोशी केली आहे. सध्या राखीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती कारमधून उतरताना दिसत आहे. यादरम्यान तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे, 'हे बघा, आज मी स्वतः टोमॅटो बनून आले आहे. मला कोण खाईल.' टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर राखी म्हणते, 'आजची ताजी बातमी आहे की मी स्वतः टोमॅटो बनून आले आहे, माझी चटणी बनवा, मला भाजीत टाका किंवा माझे सलाद बनवा आणि जे माझ्यावर जळतात त्यांना आणखी जळवा असे तिने पापाराझीला सांगितले. यावेळी राखी रस्त्यावरून धावताना आणि सर्वांचे मनोरंजन करताना दिसली. तसेच राखी यावेळी फोटोग्राफरसोबत बोलत होती.

राखीला केले ट्रोल : राखी अनेकदा तिच्या विचित्र वागण्यामुळे चर्चेत असते. तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. या व्हिडिओबाबत देखील हेच घडले आहे राखीला या व्हिडिओमुळे खूप जास्त ट्रोल केले जात आहे. अनेकजण तिला शिव्या मारत आहे. काहीजणांना मात्र हा व्हिडिओ खूप आवडत आहे. राखीच्या या व्हिडिओवर खूप कमेंट येत आहेत.

हेही वाचा :

  1. Mission Impossible 7 box office day 7: मिशन इम्पॉसिबल ७ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पार केला ७० कोटीचा आकडा...
  2. Bawaal screening: मुंबईत 'बवाल' चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले भव्य...
  3. Umesh Kamat and Priya Bapat : 'नवा गडी नवं राज्य'च्या दशकपूर्तीनंतर उमेश कामत आणि प्रिया बापट नवीन नाटकात पुन्हा एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.