मुंबई : राखी सावंत अनेकदा वादात सापडत असते. वादामुळे ती खूप चर्चेत देखील राहते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. पती आदिल खान तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राखीनं त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर आदिलने देखील एक पत्रकार परिषद घेऊन तिच्यावर आरोप केले. दरम्यान, 'कॉन्ट्रोव्हर्शियल क्वीन' आपला पहिला उमराह करण्यासाठी मक्का-मदिना येथे गेली आहे. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर राखी सावंत पहिल्यांदाच उमराहसाठी गेली आहे. राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांनी घेरलेली दिसत आहे.
राखी सावंत घातला बुरखा : मक्का मदिनामध्ये राखी सावंत बुरखा घालून दिसली. तिने यावेळी तिच्या चाहत्यांसोबत फोटोही काढले. दरम्यान एका चाहत्यानं तिला राखी म्हटले, तेव्हा ती त्याला तिचे नाव फातिमा असल्याचे सांगताना दिसली. त्यानंतर या चाहत्याने तिला फातिमा म्हटले. राखी सावंतनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अल्लाहसमोर प्रार्थना करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला असून अनेकजण तिला ट्रोल करत आहेत. एका यूजरनं म्हटले की, 'मांजर शंभर उंदीर खाऊन हजला गेली.' दुसऱ्या एकाने म्हटले, 'नाटक बंद कर, मला आता सहन होत नाही.' तर आणखी एकानं म्हटले, 'ओव्हरअॅक्टिंग करू नकोस, उमराह करायचा आहे.' अशा अनेक कमेंट तिच्या पोस्टवर येत आहेत.
राखी सावंतने धर्म का बदलला? : राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्यामुळे इस्लाम धर्म स्वीकारला होता. तिने मे 2022 मध्ये आदिलशी गुपचूप लग्न केले, त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये तिनं या गोष्टीचा खुलासा केला. मात्र, निकाहची घोषणा झाल्यानंतर काही दिवसानंतरच राखी आणि आदिलचे नाते बिघडले. तिनं तिच्या पतीवर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली. आदिल गेल्या ६ महिन्यांपासून म्हैसूर तुरुंगात बंद होता. आता तुरुंगातून बाहेर आला आहे. आदिलने पत्रकार परिषद घेऊन राखीवर अनेक गंभीर आरोप केले असून तिच्यावर कारवाई करण्याची धमकीही दिली आहे.
हेही वाचा :