ETV Bharat / entertainment

Rajshree Deshpande disclosure : मॅगझिन कव्हर आणि पुरस्कारासाठी पैशाची मागणी केल्याचा राजश्री देशपांडेचा खुलासा - अभिनेत्री राजश्री देशपांडे

मॅगझिनच्या कव्हरवर झळकण्यासाठी आणि पुरस्कार मिळण्यासाठी आपल्याकडे संबंधितांनी पैशाची मागणी केली होती असा सणसणीत आरोप अभिनेत्री राजश्री देशपांडेने केला आहे. राजश्रीची यासंदर्भातील सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चर्चेत आहे.

अभिनेत्री राजश्री देशपांडे
अभिनेत्री राजश्री देशपांडे
author img

By

Published : Apr 19, 2023, 4:41 PM IST

मुंबई - अभिनेत्री राजश्री देशपांडेने शेअर केलेली लेटेस्ट पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. समुद्र किनारी खडकामध्ये पाठमोरी बसलेल्या राजश्रीचा फोटो दिसतो. याच्या कॅप्शनमध्ये तिने जे लिहिलंय त्यामुळे तिच्या जवळच्या मित्र मैत्रीणींनी तिचे कौतुक केले आहे. तिने लिहिलंय, त्यांनी माझ्याकडे मॅगेझिनच्या कव्हरवर झळकण्यासाठी, कपड्यांसाठी व पुरस्कारासाठी पैशांची मागणी केली. पण मी है पैसे वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी, लोक आणि पर्वतांकडे पाहत हसत हसत साहसी जीवन जगण्यात खर्च करण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं मी जे केलं ते योग्य केलं बरोबर ना?, असा प्रश्नही तिने अखेर केला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर लगेचच पसरली. राजश्रीच्या या पोस्टवर फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केले.

  • They told me to pay for getting dressed up, getting into magazine covers and even for getting awards🙃 but I end up decided to spend all that in exploring different places, people, living an adventurous life laughing staring endlessly to the mountains and sea.
    Hope I did right ? pic.twitter.com/dfWdMLo5ka

    — Rajshri Deshpande (@rajshriartist) April 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राजश्रीने हीच पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवरही मजकुरासह लिहिली. या पोस्टमध्ये तिने आपला फोटो बदलला होता. तिच्या या पोस्टवरही अनेकांनी तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे आणि कौतुकही केलंय.

राजश्री देशपांडेला जगभर भटकण्याची सवय आहे. तिचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले की लक्षात येते की तिला भटकंतीची किती आवड आहे. तिने अलिकडेच एक व्हिडिओ शेअर केला होता आणि लिहिले होते, 'जिथे आकाश निळेशार असेल तिथे तुम्ही मला नेहमी शोधू शकता.'

कोण आहे राजश्री देशपांडे - राजश्री देशपांडे ही हिंदी सिनेसृष्टील गुणी अभिनेत्री असून पान नलिन या दिग्दर्शकाने बनवलेल्या अँग्री इंडियन गॉडेस या चित्रपटामध्ये तिने लक्ष्मी ही व्यक्तीरेखा साकारली होती. या भूमिकेमुळे तिला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. यानंतर तिने सनल कुमार ससिधरनच्या सेक्सी दुर्गामध्ये दुर्गा ही मुख्य भूमिका साकारली, ज्याने रॉटरडॅम फिल्म फेस्टिव्हलमध्ये हिवोस टॉगर पुरस्कार जिंकला. बीबीसी वनच्या मॅकमाफियामध्येही ती मंजूची भूमिका साकारत आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित नेटफ्लिक्स मालिका सेक्रेड गेम्समध्ये सुभद्राच्या भूमिकेसाठी राजश्री देशपांडेच्या भूमिकेची समीक्षकांची प्रशंसा केली. नंदिता दास यांच्या मंटो चित्रपटात तिने इस्मत चुगताईची ही भूमिका साकारली होती. 2012 मध्ये आमिर खान अभिनीत 'तलाश' या चित्रपटातील छोट्या भूमिकेतून राजश्री देशपांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमान खानच्या किकमध्येही तिने भूमिका साकारली. ती 2015 मध्ये मल्याळम चित्रपट हराममध्येही झळकली होती.

हेही वाचा - Get Together Teaser : पौगंडावस्थेतील प्रेमाची आठवण करून देणाऱ्या 'गेट टुगेदर' चित्रपटाचा टीझर लॉन्च

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.