ETV Bharat / entertainment

Rajkummar Rao : राजकुमार राव साकारणार शहीद भगतसिंगची भूमिका... - शहीद भगत सिंह यांची भूमिका साकारणार

राजकुमार राव पडद्यावर शहीद भगत सिंह यांची भूमिका साकारणार आहे. या नवीन प्रोजेक्टसाठी तो फार उत्सुक आहे. सध्याला तो स्त्री 2 शूटिंगमध्ये गुंतला आहे.

Rajkummar Rao
राजकुमार राव
author img

By

Published : Jun 28, 2023, 4:35 PM IST

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता राजकुमार रावच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजकुमार हा लवकरच शहीद भगतसिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी भाग घेतला आणि हसत हसत देशासाठी बलिदान दिले त्याच्यासाठी हा चित्रपट समर्पित असणार आहे. हा चित्रपट बनवायची तयारी सध्याला सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, राजकुमार त्याच्या नवीन प्रोजेक्टबद्दल फार उत्सुक आहे. यापूर्वी 2017 मध्ये या त्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारली होती. राजकुमारच्या सुभाषचंद्र बोस या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम दिले होते. आता तो पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करायला येत आहे.

राजकुमार दिसणार शहीद भगतसिंगच्या भूमिकेत : नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भूमिका साकारणाऱ्या राजकुमार राव म्हटले, भगतसिंग यांची भूमिका साकारणे हे त्यांच्या स्वप्नांपैकी एक आहे. राजकुमार आता त्याच्या नवीन प्रोजेक्टबद्दल खूप खूश आहे आणि त्याच्या टीमसोबत कामात व्यस्त आहे. तो 'स्त्री 2' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच राजकुमार पुन्हा एका चर्चेत आला होता. तसेच त्यांची स्त्री 2 शूटिंग सध्याला सुरू आहे. तसेच त्याने काही दिवसापूर्वी सेटवरील एक फोटो देखील त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. त्यामुळे सध्याला राजकुमार हा व्यस्त आहे. दुसरीकडे भगतसिंगच्या चित्रपटाविषयी बोलायला गेले तर या चित्रपटाला, ओटीटीवर आणण्याची तयारी सुरू आहे. हा चित्रपट फक्त ओटीटी फॉरमॅटमध्ये बनवला जात आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी 6 ते 8 महिने लागतील. तसेच राजकुमारचा अभिनय हा फार जास्त प्रेक्षकांना आवडतो त्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार असे दिसत आहे. हा चित्रपट देशभक्तीवर असल्याने या चित्रपटात अनेक अशा गोष्टी दाखविल्या जाणार ज्यामुळे प्रेक्षक फार भावूक होईल.

यापूर्वी हे कलाकार झळकले शहीद भगतसिंगच्या भूमिकेत : शहीद भगतसिंग यांच्यावर यापूर्वीही चित्रपट बनले आहेत हिंदी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत अनेक कलाकारांनी भगतसिंग यांची भूमिका साकारली आहे. यामध्ये अजय देवगणने द लिजेंड ऑफ भगत सिंग, भगत सिंग, शहीद-ए-आझममध्ये सोनू सूद आणि शहीद चित्रपटात मनोज कुमार हे देखील दिसले होते. बॉबी देओलने भाऊ सनी देओलच्या चित्रपटात भगतसिंगची भूमिका देखील साकारली होती.

हेही वाचा :

  1. Satyaprem Ki Katha advance booking : सत्यप्रेम की कथाच्या आगाऊ बुकींगला चांगला प्रतिसाद
  2. Ramayan : रामानंद सागर यांचा 'रामायण' ३ जुलै रोजी टीव्हीवर पुन्हा प्रदर्शित होणार
  3. Asin breaks silence on divorce: घटस्फोटाची चर्चा काल्पनिक आणि निराधार असल्याचा असिनचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.