मुंबई : रजनीकांचा 'जेलर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. दुसऱ्या वीकेंडमध्ये जबरदस्त कलेक्शन केल्यानंतर सोमवारी रजनीकांतच्या 'जेलर'ची कमाई थोडी कमी झाली आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत २८० कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'जेलर'ने ४८ कोटींची कमाई केली, त्यापैकी ३७ कोटींची कमाई फक्त तमिळ आवृत्तीपासून झाली होती. रजनीकांतचा 'जेलर' तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाला सर्वच भाषांमध्ये खूप पसंत केले जात आहे.
'जेलर'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'जेलर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं २३५ कोटी ८५ लाखांचा व्यवसाय केला होता. दुसऱ्या आठवड्याबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटानं शुक्रवारी १० कोटी ५ लाख रुपये आणि शनिवारी १६ कोटी २५ लाख रुपये तर रविवारी बॉक्स ऑफिसवर तब्बल १८ कोटी ७ लाखांची कमाई केली. दरम्यान आता सॅकनिल्क आकडेवारीनुसार, रजनीकांतच्या 'जेलर २'ने सोमवारी म्हणजेच बाराव्या दिवशी ७ कोटीचा व्यवसाय केला आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन २८८.६० कोटीवर पोहचलं आहे.
'जेलर'ने केली जबरदस्त कमाई : सुपरस्टार रजनीकांतचा यापूर्वी प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करत असला तरी यावेळी 'थलाइवा'च्या 'जेलर'ला सर्वात मोठी ओपनिंग मिळाली आहे. सध्या 'जेलर'ची स्पर्धा 'ओ माय गॉड २' आणि 'गदर २' या दोन मोठ्या बॉलीवूड चित्रपटांशी आहे. 'जेलर २' चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. या आठवड्यात हा चित्रपट ५५० कोटींचा टप्पा जगभरात सहज पार करेल अशी अपेक्षा केली जात आहे. 'जेलर'मध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्याशिवाय या चित्रपटात जॅकी श्रॉफ, मोहनलाल, शिवराजकुमार यांसारखे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची तमिळनाडूमध्ये बहुतांश शहरात मध्यम सरासरी व्याप्ती १८.६७ टक्के इतकी आहे. 'जेलर'मध्ये कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे. तसेच 'जेलर'मधील डायलॉग आणि गाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
हेही वाचा :