ETV Bharat / entertainment

‘गोदावरी’ चा निर्माता-अभिनेता जितेंद्र जोशी येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या मंचावर! - Jitendra Joshiin Godavari

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वावरणारा तगडा कलाकार जितेंद्र जोशी भाग घेताना दिसेल. त्याची निर्मिती आणि प्रमुख भूमिका असलेला ‘गोदावरी’ या चित्रपटाच्या टीमसोबत तो महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या मंचाला भेट देणार आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये जितेंद्र जोशी

author img

By

Published : Nov 9, 2022, 10:11 AM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या मंचावर अनेक सेलिब्रिटीज हजेरी लावत असतात. या कार्यक्रमात चित्रपटांच्या प्रोमोशन्सच्या निमित्ताने अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक पाहुणे म्हणून येऊन गेलेत. त्यातील काहींनी त्यातील प्रहसनांमध्येही भाग घेतला आहे. आता या कार्यक्रमात मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वावरणारा तगडा कलाकार जितेंद्र जोशी भाग घेताना दिसेल. त्याची निर्मिती आणि प्रमुख भूमिका असलेला ‘गोदावरी’ या चित्रपटाच्या टीमसोबत तो महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या मंचाला भेट देणार आहे.

महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम पाहिला जातो. हास्यरसिकांना हा कार्यक्रम आठवड्यातले चार दिवस पाहायला मिळतो. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत हा कार्यक्रम पाहिला जात असून रसिक मायबाप या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देताहेत. नेहमी वेगवेगळे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर उपस्थिती लावतात. आता महाराष्ट्राचा लाडका जितेंद्र जोशी हास्याच्या मंचावर उपस्थिती लावणार आहे. नुसतीच उपस्थिती न लावता चक्क प्रहसन सादर करताना दिसणार आहे, म्हणजेच एका स्कीटमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये जितेंद्र जोशी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये जितेंद्र जोशी

गोदावरी या चित्रपटाच्या निमित्ताने जितेंद्र जोशी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ह्या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे. चक्क समीर चौघुले आणि जितेंद्र जोशी मंचावर एकत्र प्रहसन सादर करताना दिसणार आहे. प्रेक्षकांसाठी नवनवीन विषय घेऊन येणारी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा हा विशेष भाग प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करेल हे मात्र नक्की. हा विशेष भाग प्रेक्षकांना गुरुवारी ९ नोव्हेंबर रोजी पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा - Ekdam Kadak Movie : 'आपल्या रेशनकार्डवर तुझंच नाव असणार', 'एकदम कडक' टिझर प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.