ETV Bharat / entertainment

Don 3 Update : रणवीर सिंगसोबत 'डॉन 3'मध्ये जंगली बिल्लीचीही होणार एंट्री ? - रणवीर सिंगसोबत दिसेल प्रियांका चोप्रा

Don 3 Update : अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तरच्या 'डॉन 3' चित्रपटात शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंगची एंट्री निश्चित झाली आहे. दरम्यान प्रियांका चोप्राची देखील या चित्रपटामध्ये एंट्री होत असल्याचं समजतंय.

Don 3 Update
डॉन 3 अपडेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 4:48 PM IST

मुंबई - Don 3 Update: फरहान अख्तरनं नुकतीच 'डॉन 3'ची घोषणा केली आहे. 'डॉन 3'मध्ये शाहरुख खान दिसणार नाही. या चित्रपटामध्ये किंग खानच्या ठिकाणी रणवीर सिंग दिसणार आहे. शाहरुख खान डॉन फ्रँचायझीमधून बाहेर पडला आहे. काही दिवसापूर्वी 'डॉन 3'च्या निर्मात्यांनी खुलासा केला होता की, रणवीर सिंग चित्रपटात डॉनची भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची एक छोटीशी झलकही सोशल मीडियावर शेअर केली होती. आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे की बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा देखील डॉन फ्रँचायझीमध्ये पुनरागमन करणार आहे.

'डॉन 3'मध्ये दिसेल प्रियांका चोप्रा ? : सध्या असा दावा केला जात आहे की, प्रियांका या चित्रपटाबाबत नुकतीच फरहान अख्तरला भेटली. त्यानंतर त्यांच्यात 'डॉन 3' बद्दल चर्चा झाली. प्रियांकानेही या चित्रपटासाठी ग्रीन सिग्नल दिलं असल्याचं सध्या समजत आहे. याआधी 'डॉन 3'च्या लीडसाठी कियारा अडवाणी आणि क्रिती सेनॉनची नावे समोर आली होती. आता पुन्हा एकदा प्रियांकाला पोलीस अधिकाऱ्याच्या स्टाईलमध्ये पाहायला प्रेक्षकांना मिळेल. या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी, प्रियांकाच्या बाजूनं ग्रीन सिग्नल दिसत असल्याचं समजत आहे.

वर्क्रफंट : प्रियांका चोप्रानं यापूर्वी डॉन फ्रँचायझीमध्ये काम केले आहे. या चित्रपटात तिनं पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. प्रियांकाची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. या चित्रपटामध्ये डॉनच्या भूमिकेत शाहरुख खान दिसला होता. शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राच्या जोडीनं रुपेरी पडद्यावर धमाल केली होती. डॉन फ्रेंचायझीच्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग यांच्या फिल्मोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, दोघेही यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. प्रियांका चोप्रानं यापूर्वी रणवीरसोबत 'गुंडे', 'बाजीराव मस्तानी' आणि 'दिल धडकने दो'मध्ये काम केले आहे. आता रणवीर हा 'सिंघम अगेन'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय प्रियांकाबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच 'सिटाडेल 2' मध्येही दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Kamal Haasan Birthday : 'तुम्हाला पाहात मोठं झालोय', म्हणत प्रभासनं दिल्या कमल हासनला शुभेच्छा
  2. Rashmika Mandanna and Zara Patel : रश्मिका मंदान्नाच्या मार्फ व्हिडिओवर झारा पटेलनं दिली प्रतिक्रिया
  3. Yodha New Release Date : सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'योद्धा'चं प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.