ETV Bharat / entertainment

प्रियंका चोप्राने मुलगी आणि वडिलांसोबतचे फोटो शेअर करत साजरा केला डॉटर्स डे - मुलगी मालतीसोबत प्रियंका

प्रियांका चोप्राने एक दिवस उशिरा डॉटर्स डे निमित्त तिचे दिवंगत वडील आणि मुलगी मालती यांच्यासोबतचे सुंदर आणि संस्मरणीय फोटो शेअर केले आहेत.

डॉटर्स डे
डॉटर्स डे
author img

By

Published : Sep 27, 2022, 11:17 AM IST

मुंबई - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबतचे फोटो शेअर करत असते. प्रियांकाने अद्याप तिच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. प्रियंका चोप्राने एक दिवस उशिरा डॉटर्स डेच्या निमित्ताने मुलगी मालती आणि वडील अशोक चोप्रा यांच्यासोबतचे तिचे फोटो शेअर केले आहेत. प्रियांकाने 2013 मध्ये तिचे वडील अशोक चोप्रा यांना गमावले. त्यांच्या मृत्यूनंतर प्रियंका अनेकदा तिच्या वडिलांसोबत घालवलेल्या आठवणी शेअर करत असते. अशा परिस्थितीत प्रियांका चोप्रासाठी यंदाचा डॉटर्स डे खास होता कारण ती आता एका मुलीची आई आहे.

मुलगी मालतीसोबत प्रियंका
मुलगी मालतीसोबत प्रियंका

प्रियांकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिचे वडील अशोक चोप्रासोबत डान्स करताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती मुलगी मालतीसोबत लाड करताना दिसत आहे. प्रियांकाने तिच्या वडिलांसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

प्रियंका चोप्राचा वडिलांसोबतचा फोटो
प्रियंका चोप्राचा वडिलांसोबतचा फोटो

प्रियांकाने हे फोटो शेअर करत लिहिले, एक दिवस उशीर झाला, पण माझ्यासाठी प्रत्येक दिवस डॉटर्स डे आहे. यापूर्वी प्रियांकाने खिडकीतून मुलगी मालतीची पाठमोरी झलक दाखवली होती. हा फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिले की, 'आमची पहिली मोठी ट्रिप'. या फोटोत प्रियांका चोप्रा मालतीला मांडीवर घेऊन खिडकीत बसली आहे.

याआधी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत प्रियंका चोप्राने लिहिले की, 'माझे संपूर्ण जग'. प्रियंका चोप्राने अद्याप आपल्या लाडक्या मुलीचा चेहरा दाखवलेला नाही.

लग्नाच्या चार वर्षानंतर प्रियांका चोप्राने सरोगसीद्वारे मुलगी मालतीला जन्म दिला. वर्क फ्रंटवर प्रियांका चोप्राने सिटाडेल या मालिकेचे शूटिंग पूर्ण केले आहे.

हेही वाचा - नेहा कक्करने केले दांडिया क्विन फाल्गुनी पाठकचे स्वागत पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.