वॉशिंग्टन: प्रियंका चोप्राच्या 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' या आंतरराष्ट्रीय चित्रपटातील फर्स्ट लूकचे अनावरण करण्यात आले आहे. तिचा हा लूक तुम्हाला व तुमच्या प्रियजनंना नक्की आवडेल असाच आहे. ट्विटरवर प्रियांकाने सहकलाकार सॅम ह्यूघनसोबतच्या तिच्या पहिल्या लूकची झलक शेअर केली.
फोटोमध्ये प्रियांका सॅमसोबत मिठी मारताना दिसत आहे. प्रियांकाच्या ट्विटला उत्तर देताना सॅमने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. "प्री यात आश्चर्यकारक आहे," असे त्याने ट्विट केले. प्रियांकाने ताबडतोब सॅमला उत्तर दिले, "अरे.. पहा कोण बोलत आहे सॅम ह्यूघन! मला वाटते की हा व्हॅलेंटाईन डेचा एक सुंदर चित्रपट असेल! आणि नवीन सेलिन डीओन म्यूझिक!!!"
-
It’s All Coming Back To Me!
— PRIYANKA (@priyankachopra) April 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
10th February 2023 #SeeYouAtTheMovies@SamHeughan @celinedion pic.twitter.com/UaQHMzP8RZ
">It’s All Coming Back To Me!
— PRIYANKA (@priyankachopra) April 19, 2022
10th February 2023 #SeeYouAtTheMovies@SamHeughan @celinedion pic.twitter.com/UaQHMzP8RZIt’s All Coming Back To Me!
— PRIYANKA (@priyankachopra) April 19, 2022
10th February 2023 #SeeYouAtTheMovies@SamHeughan @celinedion pic.twitter.com/UaQHMzP8RZ
सुरुवातीला 'टेक्स्ट फॉर यू' असे शीर्षक असलेला हा रोमँटिक चित्रपट 2016 च्या कॅरोलिन हरफर्थच्या 'एसएमस फर डिच' या जर्मन चित्रपटावर आधारित आहे. या प्रोजेक्टमध्ये प्रियंका आपल्या मंगेतराच्या मृत्यूनंतर पुढे जाण्यासाठी धडपडणाऱ्या महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे. सेलिन डीओन देखील 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी'चा एक भाग आहे. हा चित्रपटजे 10 फेब्रुवारी 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा - Video : प्रियंका चोप्रासह समूद्राच्या तळाशी 'सिटाडेल' टीमची पार्टी