ETV Bharat / entertainment

Priyanka chopra and preity zinta : प्रिटी झिंटा आणि प्रियांका चोप्रा जोनास ब्रदर्स कॉन्सर्टमध्ये मस्ती करताना झाल्या स्पॉट... - प्रीती झिंटाने शेअर केला व्हिडिओ

Priyanka chopra and preity zinta : अभिनेत्री प्रिटी झिंटा आणि प्रियांका चोप्रा या अलीकडेच पुन्हा एकदा एकत्र मस्ती करताना दिसल्या. प्रिटी ही प्रियांकासोबत जोनास ब्रदर्सच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती. दरम्यान आता या इव्हेंटमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. पाहा व्हिडिओ...

Priyanka chopra and preity zinta
प्रीती झिंटा आणि प्रियांका चोप्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 11:46 AM IST

मुंबई - Priyanka chopra and preity zinta : अभिनेत्री प्रिटी झिंटा जीन गुडइनफसोबत लग्न केल्यानंतर लॉस एंजेलिसमध्ये शिफ्ट झाली आहे. निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांका चोप्रा देखील लॉस एंजेलिसमध्ये राहते, त्यामुळे प्रिटी झिंटा आणि प्रियांका चोप्रा अनेकदा एकत्र दिसतात. दोघेही अनेकदा एकत्र सण साजरे करताना दिसतात. अलीकडेच पुन्हा एकदा दोन्ही एकत्र मस्ती करताना दिसल्या, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रिटी झिंटा प्रियांका चोप्राबरोबर जोनास ब्रदर्स कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती.

प्रिटी झिंटाने शेअर केला व्हिडिओ : प्रिटी झिंटानं नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती प्रियांका चोप्रासोबत म्युझिक नाईट एन्जॉय करताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये तिनं हाऊसफुल इव्हेंटमधील एक झलक दाखवली आहे. इव्हेंटमध्ये जोनास ब्रदर्स (जो जोनास, निक जोनास आणि केविन जोनास) त्यांच्या गाण्यांनी चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतायत. प्रिटी आणि प्रियांकानं या कार्यक्रमात खूप धम्माल केली. या दोघींनी एकत्र सेल्फीही काढल्या. व्हिडिओमध्ये, प्रियांकाचा पती निक जोनास स्टेजवर परफॉर्म करताना दिसतायत.

प्रिटीने प्रियांकाला कॉन्सर्टसाठी आमंत्रित केल्याबद्दल आभार मानले : हा व्हिडिओ शेअर करताना, प्रिटीनं इव्हेन्टचं निमंत्रण दिल्याबद्दल आभार मानले. तिनं लिहिलं, 'किती मजेदार रात्र आहे आणि जोनास ब्रदर्सच्या सर्व संगीताची ओळख करून देण्याचा हा किती मजेदार मार्ग आहे. इतकी चांगली होस्ट असल्याबद्दल प्रियांका खूप खूप धन्यवाद. निक जोनास तुम्ही काल रात्री तुमच्या गाण्यांनी आम्हाला रिझवलं. ही एक अप्रतिम कामगिरी आहे. बाकी दौऱ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. काल रात्री मी अधिकृतपणे जोनास ब्रदर्सचा चाहती झाले.

प्रिटी झिंटा आणि प्रियांका चोप्रा यांचा वर्कफ्रंट : प्रिटीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, प्रिटी झिंटा सनी देओलसोबत 2018 मध्ये नीरज पाठकच्या अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपट 'भाईजी सुपरहिट'मध्ये शेवटची दिसली होती. याशिवाय प्रिटी अमेरिकन सिट-कॉम 'फ्रेश ऑफ द बोट'मध्ये वीर दाससोबत दिसली होती. प्रियांका चोप्राबद्दल सांगायचं तर, बॉलिवूडमध्ये अभिनय कौशल्य दाखविल्यानंतर, 'देसी गर्ल'नं आपला ठसा उमटवण्यासाठी हॉलिवूडकडे धाव घेतली. आत्तापर्यंत, तिनं अनेक हॉलिवूड प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे. अलीकडेच ती हॉलिवूड स्टार रिचर्ड मॅडेनसोबत 'सिटाडेल'मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसली होती.

हेही वाचा :

  1. G20 Summit : ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी जी20 परिषदेदरम्यान 'आरआरआर'चे केलं कौतुक...राजामौली यांनी मानले आभार
  2. Babil Khan : इरफान खानच्या मुलाने 'स्टार किड' असण्याचं नाकारलं ; म्हणाला वडिलांमुळं मिळतो विशेषाधिकार...
  3. Shahrukh Khan Funny Reply : 'जवान' चित्रपटाबाबत शाहरुख खाननं दिला चाहत्याला सल्ला...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.