ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra :प्रियांकाने दिलेल्या उत्तरामुळे करण जोहर निरुत्तर - लग्नाचे आमंत्रण

करण जोहरच्या कॉफी विथ करण सीझन 6 मधील एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये प्रियांका चोप्राला करण हा तिच्या लग्नाला आमंत्रित न करण्याबद्दल विचारत दिसत आहे. त्यावर प्रियांकाने करणला चांगलेच उत्तर दिले आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा
author img

By

Published : May 31, 2023, 11:53 AM IST

मुंबई : ग्लोबल आयकॉन स्टार प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील तिच्या अनुभवांबद्दल बरेच काही शेअर करत असते. सध्याला प्रियांकाची चित्रपट निर्माता करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करण सीझन 6 मधील एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियांकाने उत्तर दिल्यानंतर करण झाला गप : या क्लिपमध्ये प्रियांकाने 2018मध्ये झालेल्या तिच्या लग्नाबद्दल सांगितले आहे. तिने या व्हिडिओ क्लिपमध्ये तिचे भारतीय पद्धतीने लग्न कसे झाले हे सांगितले आहे. तसेच बोलताना तिने म्हटले 'मी आणि निकने आमंत्रणे देण्यात मर्यादा ठेवली होती. 'आम्ही नातेवाईकांना आणि मित्रांना आमंत्रणे ही मर्यादित देण्याचा निर्णय घेतला होता हे तिने स्पष्टपणे सांगितले आहे. क्लिपमध्ये, प्रियांका पुढे म्हटले, 'खरं तर मी तुम्हाला सांगते, आमचे लग्न खूप मजेदार होते कारण ते फक्त कौटुंबिक होते. यात माझे कुटुंब आणि त्यांचे अफाट कुटुंबातील... असे बोलतांच क्षणी करणने तिला अडवले आणि प्रश्न केला. त्याला किंवा बॉलीवूडमधील कोणालाही आमंत्रित न केल्याबद्दल. तो म्हणाला, 'तुम्ही आमच्यापैकी कोणालाही बोलावले नाही. 'तेव्हा प्रियांकाने एक स्माईल दिली आणि म्हणाली, 'मला देखील तुमच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करण्यात येत नाही' यावर करण हा गप बसला.

प्रियंकाची ही व्हिडिओ क्लिप ट्विटर, रेडीट आणि इंन्टाग्राम यासह अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. चाहते या व्हिडिओ क्लिपला मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. तसेच सिटाडेल दिग्दर्शक हे प्रियांकाच्या स्पष्ट मताला किती महत्त्व देते यावर देखील तिने भाष्य केले आहे. तसेच प्रियांकाच्या या व्हिडिओ क्लिपवर फार कमेंट आल्या आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एका चाहत्याने कमेंट केली, 'मला फक्त पीसी आणि तुझा प्रामाणिकपणा आवडतो. 'दुसर्‍याने यावर कमेंट दिली, 'माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ती योग्य उत्तर देते. मला तिचे हे फार आवडते. चांगल्या रित्या हळूवार बदला घेतला अशा अनेक कमेंट या व्हिडिओ क्लिपवर आल्या आहे. प्रियांका चोप्रा अखेर हॉलिवूड चित्रपट 'लव्ह अगेन'मध्ये दिसली होती. आता ती लवकरच दिग्दर्शक फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ या देखील असणार आहेत.

हेही वाचा :

  1. Mi Honar Superstar Chhote Ustad 2 : मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २ च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी उचललीय वैदेही परशुरामीने!
  2. Nick Jonas lauds Tiger Shroff : टायगर श्रॉफने गायले निक जोनासचे गाणे, व्हिडिओ पाहून निक म्हणाला, 'लव्ह इट ब्रो'
  3. Box office collection: मल्याळम चित्रपट '2018 एव्हरी इज ए हिरो'ने रचला इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.