ETV Bharat / entertainment

प्रियंका चोप्राची लेक १०० दिवसानंतर रुग्णालयातून परतली, पाहा पहिली झलक

मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने तिची मुलगी मालती मेरीची पहिली झलक शेअर केली आहे. एनआयसीयू मध्ये (Neonatal Intensive Care Unit) मध्ये 100 दिवस घालवल्यानंतर नवजात बाळ घरी आले आहे.

प्रियंका चोप्राची लेक
प्रियंका चोप्राची लेक
author img

By

Published : May 9, 2022, 12:06 PM IST

मुंबई - प्रियांका चोप्रा आणि निक जोनास ( Priyanka Chopra and Nick Jonas ) यांचा आनंद गगनाला भिडला आहे, कारण त्यांची लाडकी लेक घरी परतली आहे. जन्मानंतर १०० दिवस या बाळाला 100 दिवस निरीक्षणाखाली एनआयसीयू (Neonatal Intensive Care Unit) ठेवावे लागेल होते. मदर्स डेच्यानिमित्ताने प्रियंकाने इन्स्टाग्रामवर नवजात मुलगी मालती मेरीचा फोटो शेअर करीत लिलिहले, "अखेर ती घरी आली."

"NICU मध्ये 100 पेक्षा जास्त दिवसांनंतर, आमची लहान मुलगी शेवटी घरी परतली आहे. प्रत्येक कुटुंबाचा प्रवास अनोखा असतो आणि त्यासाठी विश्वासाची एका विशिष्ट पातळीची आवश्यकता असते. आमच्यासाठी गेली काही महिने आव्हानात्मक होते. मागे वळून पाहिल्यास, प्रत्येक क्षण किती मौल्यवान आणि परिपूर्ण होता हे पुरेपुर स्पष्ट होते," असे प्रियंकाने लिहिले आहे.

मालतीची योग्य काळजी घेतल्याबद्दल प्रियांकाने डॉक्टरांचेही आभार मानले. "आम्ही खूप आनंदी आहोत की आमची लहान मुलगी शेवटी घरी आली आहे, आणि फक्त प्रत्येक डॉक्टर, नर्स आणि रेडी चिल्ड्रेन ला जोला आणि सीडर सिनाई, लॉस एंजेलिस येथील सर्व प्रत्येक पायरीवर निस्वार्थपणे कामकरणाऱ्या तज्ञांचे आभार मानते. आता आमचे दुसरे पर्व सुरू झाले आहे आणि आमचे बाळ चतुर आहे. आई आमि बाबांचे त्याच्यावर खूप प्रेम आहे. माझ्या आणि तिथल्या सर्व मातांना आणि काळजीवाहकांना मदर्स डेच्या शुभेच्छा. धन्यवाद," असे ती पुढे म्हणाली.

प्रियांकाने आईपण दिल्याबद्दल पती निक जोनासचेही आभार मानले आहेत. प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोवर प्रतिक्रियांचा पाऊस सुरू आहे. निकनेही हाच फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आणि पत्नी प्रियांकाचे आभार मानले आहेत.

प्रियांका आणि निक जोनास यांनी 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांनी जानेवारी 2022 मध्ये सरोगसीद्वारे बाळाचे स्वागत केले होते.

हेही वाचा - Mother's Day 2022 : आलिया, विकी कौशल, कॅटरिनाने चाहत्यांना दिल्या मदर्स डे च्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.