ETV Bharat / entertainment

प्रभासचा नवा लूक आला समोर, स्टारर 'द राजा साब'चं पोस्टर रिलीज - प्रभासचा आगामी चित्रपट

The Raja Saab : साऊथचा अभिनेता प्रभास अभिनीत 'द राजा साब' चित्रपटामधील फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झालं आहे. या चित्रपटामध्ये प्रभास अनोख्या अंदाजात दिसणार आहे.

The Raja Saab
द राजा साब
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 10:38 AM IST

मुंबई - The Raja Saab: साऊथचा अभिनेता प्रभास सध्या 'सालार पार्ट 1 सीझफायर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 700 कोटीचा व्यवसाय केला आहे. 'सालार'नंतर प्रभास आता दिग्दर्शक मारुतीसोबत त्याच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे. प्रभास 'द राजा साब' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दरम्यान 'द राजा साब' चित्रपटामधील प्रभासचं फर्स्ट लूक पोस्टर आज सोमवार, 15 जानेवारी रोजी सकाळी रिलीज करण्यात आलं आहे. चित्रपटामधील या पोस्टरमध्ये तो लुंगीवर दिसत आहे.

'द राजा साब' या चित्रपटाचं प्रभासची पहिली झलक : 'द राजा साब' या चित्रपटामधील फर्स्ट लूकमध्ये तो लुंगीसोबत काळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत असून त्याचा ही झलक त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना प्रभासनं लिहिलं की,' या सणासुदीच्या हंगामात, 'द राजा साब'ची पहिली झलक. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.'' सुप्रसिद्ध दिग्दर्शक मारुती या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून त्यांनी 'द राजा साब'ची कथाही लिहिली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पुरस्कार विजेते थमन एस प्रभासच्या या चित्रपटाला संगीत देणार आहेत.

प्रभासच्या चाहत्यांना आहे या चित्रपटाची प्रतीक्षा : आज पहाटे चित्रपटाचे पोस्टर रिलीज होताचं प्रभासच्या चाहत्यांना आनंद झाला. या चित्रपटाचे पोस्टरवर आता अनेकजण कमेंट्स करत आहेत. चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. प्रभासच्या पोस्टवर कमेंट करून एका चाहत्यानं लिहिलं ''प्रभास मी तुझा खूप मोठा चाहता आहे, मी या चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहात आहे.'' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, हा चित्रपट कधी रिलीज होणार, मी आता आणखी वाट पाहू शकत नाही.'' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, '' प्रभास तुझा हा चित्रपट हिट होणार आहे.'' या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून त्यांचे त्याला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'हनुमान' निर्मात्यांनी राम मंदिर ट्रस्टला 14 लाखांची दिली देणगी
  2. 'रेड 2' मध्ये वाणी कपूर आणि रितेश देशमुख करणार स्क्रीन शेअर, अजय देवगणसोबत!
  3. 'बिग बॉस 17'मध्ये अंकितासह विकी जैनला ज्योतिषींनी दिला 'हा' सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.