ETV Bharat / entertainment

प्रभासने क्रिती सेनॉनला घातली लग्नाची मागणी, लवकरच होईल एंगेजमेंट - प्रभास आणि क्रिती सेनॉन एंगेजमेंट

'आदिपुरुष' या चित्रपटात प्रभास-क्रितीची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवरच प्रभासने क्रितीला प्रपोज केले होते. प्रभासच्या या प्रपोजलवर क्रितीने काय दिली प्रतिक्रिया. पूर्ण बातमी वाचा.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 29, 2022, 3:33 PM IST

हैदराबाद - साऊथ आणि बॉलिवूडमधील प्रभास आणि क्रिती सेनॉन या कथित जोडीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. प्रभासने क्रिती सेनॉनला प्रपोज केले असून लवकरच हे जोडपे एंगेज होणार आहे. विशेष म्हणजे प्रभास-क्रिती ही जोडी 'आदिपुरुष' चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रभासने क्रितीला सेटवर प्रपोज केले होते. प्रभासच्या या प्रपोजलवर क्रितीने काय दिली प्रतिक्रिया यासाठी पूर्ण बातमी वाचा.

प्रभासच्या प्रपोजलवर क्रितीने काय दिले उत्तर - मीडिया रिपोर्ट्सनुसार, साऊथ सुपरस्टार प्रभासने बर्‍याच दिवसांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान क्रितीला प्रपोज केले होते आणि असे म्हटले जात आहे की क्रितीने प्रभासच्या प्रपोजलला होकार दिला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, हे कथित जोडपे लवकरच त्यांच्या नात्याची व लग्नाची घोषणा करणार आहेत. याबाबत माहिती देताना फिल्म इंडस्ट्रीची इनसाईड स्कूप देणारे उमेर संधू यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'आदिपुरुष'च्या शूटिंगदरम्यान प्रभासने क्रिती सेनॉनला प्रपोज केले होते, याची अधिकृत पुष्टी झाली आहे. दोघे अजूनही रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत. मात्र, या जोडप्याकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

वरुण धवननेही दिला मोठा इशारा - 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान क्रितीचा सह-अभिनेता वरुण धवननेही असे संकेत दिले होते की, क्रितीसाठी एक 'उंच शेहजादा' तिच्या आयुष्यात परफेक्ट फिट असेल. वरुण धवनचे हे वक्तव्य सोशल मीडियावर इकडून तिकडे व्हायरल झाले. याशिवाय, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये क्रिती 'आदिपुरुष' चित्रपटासाठी तिला तेलुगू भाषा शिकवण्यासाठी प्रभास तिचा तेलुगू शिक्षक बनल्याचे सांगत होती.

आदिपुरुष कधी रिलीज होणार - बॉलिवूडची 'परम सुंदरी' क्रिती सेनॉन सध्या तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'भेडिया' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री वरुण धवन सोबत दिसणार आहे. हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला असून चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन ३ कोटींहून अधिक झाले आहे. दरम्यान, क्रिती सेननच्या कामाव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे, आजकाल क्रिती मेगा-बजेट पॅन इंडिया चित्रपट 'आदिपुरुष' वर देखील काम करत आहे. या चित्रपटात ती साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहे. या चित्रपटासोबत क्रिती-प्रभास डेट करत असल्याच्या बातम्यांनी चांगलाच वेग घेतला आणि आता क्रिती सहकलाकार प्रभाससोबत 'लग्न' करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचा - 'द काश्मीर फाईल'ला 'व्हल्गर प्रपोगंडा' म्हणणाऱ्या इफ्फी ज्युरीचे स्वरा भास्करने केले समर्थन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.