ETV Bharat / entertainment

पूजा हेगडेने इंडिगोच्या कर्मचाऱ्याला घेतले फैलावर, एअरलाइनने मागितली माफी

author img

By

Published : Jun 10, 2022, 9:44 AM IST

तामिळ आणि तेलुगू चित्रपट उद्योगातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या पूजा हेगडेने गुरुवारी इंडिगोच्या एका कर्मचार्‍याला फैलावर घेतले. त्या व्यक्तीने अभिनेत्री आणि तिची टीम मुंबईबाहेर जात असताना विनाकारण कास्टूम असिस्टंटसोबत असभ्य वर्तन केले होते.

पूजा हेगडे
पूजा हेगडे

चेन्नई - तामिळ आणि तेलुगू चित्रपट उद्योगातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या पूजा हेगडेने ( Pooja Hegde ) गुरुवारी इंडिगोच्या एका कर्मचार्‍याला फैलावर घेतले. त्या व्यक्तीने अभिनेत्री आणि तिची टीम मुंबईबाहेर जात असताना विनाकारण कास्टूम असिस्टंटसोबत असभ्य वर्तन केले होते.

ट्विटरवर पूजा हेगडेने लिहिले की, "विपुल नकाशे नावाच्या इंडिगो ( IndiGo6E ) स्टाफने आज मुंबईहून निघालेल्या फ्लाइटमध्ये आमच्याशी किती उद्धट वर्तन केले, याबद्दल अत्यंत दुःखी आहे. विनाकारण आमच्याशी उर्मट, अज्ञानी आणि धमकावणाऱ्या आवाजात तो आमच्याशी बोलला.खरंतय असा अडचणींबद्दल मी सहसा ट्विट करीत नाही, परंतु हे खरोखरच भयावह होते."

  • Extremely sad with how rude @IndiGo6E staff member, by the name of Vipul Nakashe behaved with us today on our flight out from Mumbai.Absolutely arrogant, ignorant and threatening tone used with us for no reason.Normally I don’t tweet abt these issues, but this was truly appalling

    — Pooja Hegde (@hegdepooja) June 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पूजाच्या ट्विटला एअरलाइनकडून तातडीनेप्रतिसाद मिळाला आणि समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात पूजा आणि तिच्या टीमला झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

एअरलाइनने म्हटले, "आमच्याशी बोलण्यासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, मिस हेगडे. आम्ही तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून दिलगीर आहोत आणि तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आम्ही या प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी यापुढे आम्ही खात्रीने लक्ष देऊ."

पूजाने एअरलाइनने पाठवलेला माफीनामा स्वीकारला, पण भेदभाव केला गेल्याबद्दल आधी तिच्या कॉस्टूम असिस्टंची माफी मागितली पाहिजे, असे म्हटले.

तिने ट्विट केले की, "त्याच्या वागणुकीबद्दल माफी मागितल्याबद्दल धन्यवाद पण प्रामाणिकपणे, भेदभाव केल्याबद्दल पहिली माफी माझ्या कॉस्टूम असिस्टंची मागितली पाहिजे आणि नंतर आमची. प्रत्येकाशी आदराने वागले पाहिजे मग तो कुठूनही आला असेल किंवा तो कोणही असेल. बोलण्याचीही एक पध्दत असते."

"आपण असा दावा करू शकत नाही की पर्स हातातील सामान म्हणून गणली जाते आणि वास्तविक कॅरी-ऑन बॅगला परवानगी देऊ शकत नाही. शिवाय, कोणत्याही कारणाशिवाय, आपण शक्ती दाखवण्यासाठी एखाद्याला खाली उतरवण्याची धमकी देऊ शकत नाही. या ट्विटचा मुद्दा असा होता की शक्तीचा दुरुपयोग करु नये आणि सर्व लोकांना समानतेने आणि दयाळूपणे वागवले जावे."

हेही वाचा - नयनतारा विघ्नेशच्या विवाहाचे फोटो, शाहरुखनेही लावली हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.