मुंबई - Pooja Bhatt And Shah Rukh Khan : चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि यांची मुलगी पूजा भट्ट 1990 मध्ये व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे खूप ट्रोल झाले होते. एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर हा फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यामध्ये पूजा तिच्या वडिलांना किस करताना दिसली होती. वडिलांना किस करतानाचा हा फोटो खूप चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर पूजाला अनेकांनी या गोष्टीमुळं खूप काही सुनावलं होतं. हा फोटो अनेक न्यूज पेपरमध्ये पहिल्या पेजवर घेतला होता. पूजा आणि महेश भट्टचा फोटो त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता.
पूजा भट्ट वडिलांसोबत चुंबन घेते : दरम्यान आता या याप्रकरणी पूजानं आपलं मत शेअर केलं आहे. जेव्हा पूजा भट्टला मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले की, तिला फोटोशूट करून वडिलांना किस केल्याचा पश्चाताप होतो का? ज्यावर तिनं उत्तर दिलं, 'नाही, कारण मी ते अगदी सोप्या पद्धतीनं पाहते. मला वाटतं की दुर्दैवाने कधीकधी असं घडतं. एक क्षणात तुमची प्रतिमा ही चुकीच्या पद्धतीनं दाखवली जात नाही.' त्यानंतर तिनं सुपरस्टार शाहरुख खानबद्दल म्हटलं, मला आठवतं की शाहरुख खाननं मला सांगितलं होतं की, जेव्हा तुम्हाला मुली होतात, तेव्हा तुमची मुलं लहान असतात, असं किती वेळा होतं की ते तुम्हाला मम्मी म्हणतात आणि 'किस मी, डॅडी म्हणतात. ही सुद्धा तीच गोष्ट आहे.
निरागस क्षण : पूजा भट्टनं पुढं सांगितलं, या वयातही मी माझ्या वडिलांसाठी 10 पौंडांची बाळ आहे. मी त्यांच्यासाठी आयुष्यभर बाळ असेल. पुढं तिनं सांगितलं ' हा एक निरागस क्षण होता, जो कॅमेऱ्यात कैद झाला. ज्यांना ते वाचायचे आहे ते वाचतील, ज्यांना बघायचं आहे ते पाहतील. मी याबद्दल बचाव करणार नाही. लोक कौटुंबिक मूल्यांबद्दल बोलतात. बाप-मुलीच्या नात्याकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पाहतात, हा एक आश्चर्यकारक विनोद आहे.
हेही वाचा :
- Jawan box office collection day 5: शाहरुख खान स्टारर 'जवान' 300 कोटींचा टप्पा पार करणार...
- Priyanka chopra and preity zinta : प्रिटी झिंटा आणि प्रियांका चोप्रा जोनास ब्रदर्स कॉन्सर्टमध्ये मस्ती करताना झाल्या स्पॉट...
- Special screening of Jawan : दिग्दर्शक अॅटलीनं देशाच्या खऱ्या 'जवान'साठी केलं स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन....