मुंबई : 16 जूनला रिलीज होणारा ओम राऊतचा 'आदिपुरुष' हा चित्रपट ट्रेलरपासूनच वादात सापडला आहे. त्याचवेळी, रिलीजनंतर, खराब व्हीएफएक्स आणि संवादांमुळे त्याला खूप टीकेला सामोरे जावे लागले. यानंतर चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर पुढे आले आणि त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. दुसऱ्या दिवशीच, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या काही संवादांमध्ये बदल झाल्याची पुष्टी केली, आणि सांगितले की, ज्या संवादांवर आक्षेप घेतला जात आहे, त्यात सुधारणा करून हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित केला जाईल.
-
रामकथा से पहला पाठ जो कोई सीख सकता है, वो है हर भावना का सम्मान करना.
— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) June 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
सही या ग़लत, समय के अनुसार बदल जाता है, भावना रह जाती है.
आदिपुरुष में 4000 से भी ज़्यादा पंक्तियों के संवाद मैंने लिखे, 5 पंक्तियों पर कुछ भावनाएँ आहत हुईं.
उन सैकड़ों पंक्तियों में जहाँ श्री राम का यशगान…
">रामकथा से पहला पाठ जो कोई सीख सकता है, वो है हर भावना का सम्मान करना.
— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) June 18, 2023
सही या ग़लत, समय के अनुसार बदल जाता है, भावना रह जाती है.
आदिपुरुष में 4000 से भी ज़्यादा पंक्तियों के संवाद मैंने लिखे, 5 पंक्तियों पर कुछ भावनाएँ आहत हुईं.
उन सैकड़ों पंक्तियों में जहाँ श्री राम का यशगान…रामकथा से पहला पाठ जो कोई सीख सकता है, वो है हर भावना का सम्मान करना.
— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) June 18, 2023
सही या ग़लत, समय के अनुसार बदल जाता है, भावना रह जाती है.
आदिपुरुष में 4000 से भी ज़्यादा पंक्तियों के संवाद मैंने लिखे, 5 पंक्तियों पर कुछ भावनाएँ आहत हुईं.
उन सैकड़ों पंक्तियों में जहाँ श्री राम का यशगान…
आदिपुरुष वादात : त्याचबरोबर राजकारण्यांनीही या चित्रपटावर टीका केली. आता अलीकडेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आदिपुरुषच्या संवाद वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले, 'कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू देणार नाही आणि सीवीएफली (CBFC) (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) चित्रपटाच्या संवादांवर बारकाईने लक्ष देईल'. वादांबद्दल बोलताना ते म्हणाले, 'सीबीएफसीने चित्रपटाच्या वादांची दखल घेत कोणत्याही किंमतीत लोकांच्या भावना दुखावू देणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, निदान त्याच्या नजरेखाली तरी नाही असे काही होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले आहे. याशिवाय राजकारणी आणि अभिनेते मनोज तिवारी यांनीही आदिपुरुषावर सुरू असलेल्या वादावर आपले मत मांडले आहे. ते म्हणाले, 'चित्रपटात लिहिलेल्या संवादामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. जे कोणत्याही प्रकारे योग्य नाही, चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी चित्रपटातील संवाद बदलण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा मी आदर करतो.
प्रेक्षकांच्या दुखविल्या गेल्या भावना : ओम राऊत लिखित आणि दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट वाल्मिकींच्या रामायणावर आधारित आहे. हा चित्रपट 16 जून रोजी चित्रपटगृहात मोठ्या धूमधडाक्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनॉन, लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग आहे. तसेच देवदत्त नाग बजरंग भूमिकेत तर सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत आहे. 500 कोटींच्या मेगा बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :