मुंबई - Pippa Trailer : अभिनेता ईशान खट्टरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'पिप्पा' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर, प्रियांशू पैन्युली आणि सोनी राजदान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचा ट्रेलर खूपच दमदार आहे. हा चित्रपट पाकिस्तानापासून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या घटनेवर आधारित आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आवाज ऐकू येत आहे. इंदिरा गांधी रेडिओवरून पाकिस्तानशी युद्धाची घोषणा करत आहेत. या ट्रेलरमध्ये भारतीय सैना बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रेलरमध्ये युद्धाची दृश्येही दाखविल्या गेली आहेत. याशिवाय रशियन पाणबुड्याही पाण्यात तरंगतांना देखील दाखविल्या गेल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'पिप्पा'चा ट्रेलर रिलीज : 'पिप्पा'मध्ये ईशान खट्टर (बलराम सिंग मेहता)एका सैनिकाची भूमिका साकारत आहे, जो बांगलादेशच्या 6 कोटी लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पाकिस्तानसोबत युद्ध करत आहे. या चित्रपटामध्ये तो स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सैन्यात भरती होताना दिसत आहे. 'पिप्पा' चित्रपटात प्रियांशु पैन्युली (राम मेहता ) ईशान खट्टरच्या मोठ्या भावाची भूमिका साकारत आहे. यापूर्वी भारत-पाकिस्तान आणि १९७१ च्या युद्धावर अनेक चित्रपट बनली आहेत. यावेळी ईशान खट्टर या चित्रपटाद्वारे काहीतरी वेगळ घेऊन येत आहे. युद्धाची भीषणता ट्रेलरमध्ये दाखविण्यात आली आहे. याशिवाय 'पिप्पा' चित्रपटामधून प्रेक्षकांच्या मनात देशप्रेमाची भावना नक्कीच जागी होईल.
चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित : 'पिप्पा' हा चित्रपट थिएटरमध्ये नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) वर स्ट्रीम केला जाणार आहे. 10 नोव्हेंबरपासून तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर घरी बसून हा चित्रपट पाहू शकाल. या चित्रपटाला ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे. 'पिप्पा'चे दिग्दर्शन राज कृष्ण मेनन यांनी केले आहे, ज्यांनी 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' आणि अक्षय कुमारसोबत 'एअरलिफ्ट' हा चित्रपट बनवला होता. आता सध्या या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेनं पाहत आहे.
हेही वाचा :