मुंबई - बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने तमाम विरोधक आणि बॉलिवूड बॉयकॉट गँगचे तोंड अशा प्रकारे बंद केले की 'पठाण' बद्दल बोलण्यापूर्वी ते आता 100 वेळा विचार करतील. पठाण चित्रपटाने 12 दिवसात 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या चार वर्षांपासून ज्याचे बॉलिवूड करिअर संपुष्टात आले होते, असे वाटले होते, त्या शाहरुख खानने अखेर 'पठाण जिंदा है' हे दाखवून दिले.
-
#Pathaan is unstoppable 💥
— Yash Raj Films (@yrf) February 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Book your tickets here - https://t.co/SD17p6x9HI | https://t.co/VkhFng6vBj
Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you, in Hindi, Tamil and Telugu. pic.twitter.com/S1O0tysYG9
">#Pathaan is unstoppable 💥
— Yash Raj Films (@yrf) February 6, 2023
Book your tickets here - https://t.co/SD17p6x9HI | https://t.co/VkhFng6vBj
Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you, in Hindi, Tamil and Telugu. pic.twitter.com/S1O0tysYG9#Pathaan is unstoppable 💥
— Yash Raj Films (@yrf) February 6, 2023
Book your tickets here - https://t.co/SD17p6x9HI | https://t.co/VkhFng6vBj
Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you, in Hindi, Tamil and Telugu. pic.twitter.com/S1O0tysYG9
पठाणचे 12 व्या दिवसाचे कलेक्शन - 25 जानेवारी रोजी रिलीज झालेला 'पठाण' चित्रपट 13 व्या दिवशी तितकाच जोरात सुरू आहे. चित्रपटाने 12व्या दिवशी (रविवार-5 फेब्रुवारी) म्हणजेच दुसऱ्या वीकेंडला रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 28 कोटी रुपयांची कमाई केली. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 400 कोटी रुपये झाले आहे.
पठाणने एकूण ८३२ कोटी कमाई केल्याचा यशराज फिल्म्सचा दावा - पठाण चित्रपट थांबायचे नावच घेत नाही, असे कॅप्शन देत यशराज फिल्म्सने एक बॅनर फोटो शेअर केला आहे. यावर त्यांनी पठाची एकूण कमाई अधोरेखीत केली आहे. जगात सर्वाधिक कमाई करणारा हिंदीतील पहिला सिनेमा, असे लिहिले असून जगभरातील एकूण कमाई ८३२ कोटी झाल्याचे म्हटले आहे. पठाण चित्रपटाने भारतात एकूण कमाई ( तेलुगु, तमिळसह ) ५१५ कोटी कमवले आहेत. तर परदेशात ३१७ कोटींची कमाई झाली असल्याचे जाहीर केले आहे.
पठाणची जगभरात कमाई - पठाणची जगभरातील जादू अजूनही कायम आहे. 5 दिवसांत एका चुटकीसरशी 500 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या 'पठाण'ने आता 12 दिवसांत 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरात ३२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. ही चित्रपटाची एकूण कमाई आहे.
'दंगल'लाही मागे टाकले - भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आमिर खान स्टारर 'दंगल' होता, ज्याने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 387 कोटींचा व्यवसाय केला होता, पण शाहरुखने हा विक्रम मोडला. पठाण'ने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या नावावर नवा विक्रम केला आहे. दंगलला मागे टाकत 'पठाण' चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 430 कोटींची कमाई केली आहे. 'पठाण' 12 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे आणि आता चित्रपटाची कमाई कुठे थांबते हे पाहणे बाकी आहे.
हेही वाचा - Pathaan Collection : 'पठाण' ने तोडले दंगलचे रेकॉर्ड, 11 दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट