मुंबई - Parineeti chopra video : चाहते अभिनेता परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या जोडप्यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये हे दोघे शाही पद्धतीनं लग्न करणार आहेत. लग्नाच्या तयारीदरम्यान, राघव चढ्ढा आणि परिणीती हे नुकतीच विमानतळावर स्पॉट झाले. विमानतळावर परिणीती चोप्रानं पांढऱ्या टी- शर्टसह निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स परिधान केला होता. यावर तिनं एक टोपी घातली होती. या टोपीवर तिच्या होणाऱ्या पती राघव यांच्या नावाचे पहिले अक्षर 'आर' असं लिहिलं होतं. परिणीती चोप्रा या लूकमध्ये खूप खास दिसत होती. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
परिणीती चोप्रा पापाराझींवर चिडली : परिणीतीचा काल एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. व्हिडिओमध्ये परिणीती पापाराझींवर चिडताना दिसत होती. यावेळी ती गाडीतून खाली उतरताच पापाराझींनी तिच्यासमोर कॅमेरे आणले. त्यानंतर पापाराझीच्या या कृतीवर तिला राग आला. परिणीतीनं पापाराझीला म्हटलं, 'मी तुम्हाल आमंत्रण दिलं नाही.' असं तिनं सांगितलं. त्यानंतर परिणीतीनं हात जोडून म्हटलं की, 'फोटो काढणं बंद करा'. याप्रकरणी अनेक सोशल मीडिया यूजर्सनं परिणीती चोप्राला समर्थन दिलं. परिणीतीच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर, हे जोडपे 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या 'द लीला पॅलेस'मध्ये सात फेरे घेतील. या लग्नामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार आणि राजकारणी उपस्थित राहणार आहेत.
राघव चढ्ढा हे राजेशाही शैलीत प्रवेश करणार : राघव चड्ढा हे आपल्या वधूला घेण्यासाठी हत्ती, घोडा किंवा गाडीवर येणार नाही. ते परिणीती चोप्राला शाही बोटीमधून घेऊन जाणार आहेत. त्यानंतर हे जोडपे बोटीनं हॉटेल ताज येथे पोहोचणार आहे. त्याचबरोबर लग्नाच्या या शाही प्रवेशाची तयारीही जोरात सुरू आहे. याशिवाय या जोडप्याच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. आता अनेकदा परिणीती ही लग्नाची शॉपिंग करताना दिसते.
हेही वाचा :