ETV Bharat / entertainment

Parineeti Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकणार? - परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा

आप नेते राघव चड्ढासोबत परिणीती चोप्राच्या भेटीमुळे यापूर्वी डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. तथापि, अलीकडील माहितीनुसार, हे जोडपे ऑक्टोबरच्या शेवटी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा
author img

By

Published : Apr 21, 2023, 5:23 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्या नात्याबद्दलच्या एका नवीन माहितीमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, परिणीती आणि राघव या वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये लग्न करणार आहेत. या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, परिणीती आणि राघव यांचा रोका खाजगीरित्या करण्यात आला होता.

राघव आणि परिणीतीचा रोका समारंभ - या कौटुबीक सोहळ्यात दोघेही खूप आनंदात दिसत होते. या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस हे जोडपे लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे. लग्नाचा उत्सव सुरू करण्यापूर्वी, राघव आणि परिणिती यांना आपल्या कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे त्यांना लग्नाची फार घाई नाही. परिणीती नुकतीच तिच्या बोटावर अंगठी घालून मिरवताना दिसली. मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती आणि राघवने त्यांच्या लग्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. या जोडप्याने जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत रोका समारंभ उत्साहत पार पाडला.

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राचे नाते अद्याप गुलदस्त्यात - राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी अद्याप त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही. मात्र, दोघेही अनेकदा एकत्र दिसले. ते पहिल्यांदा मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते, त्यानंतर आणखी एकदा ते एकत्र स्पॉट झाले होते. दिल्लीतील विमानतळावरही परिणीतीच्या स्वागतासाठी राघव दाखल झाला होता.

प्रियंका भारतात परतणार - ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात, परिणीतीची चुलत बहीण प्रियंका 23 व्या जिओ मामी चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहे. असे मानले जात आहे की प्रियंका चोप्रा उपस्थितीत राहावी यासाठी ऑक्टोबरमध्ये परिणीतीचा विवाह आयोजित केला जाणार आहे. त्यांचा विवाह हा भारतातील सर्वात लक्षवेधी ठरणार यात कोणतीच शंका नाही.

परिणीती आणि राघवा एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. दोघांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतले. व्यावसायिक आघाडीवर, इम्तियाज अलीच्या चमकिला चित्रपटात परिणीती दिलजीत दोसांझसोबत काम करणार आहे. अमरसिंग चमकीला या पंजाबी गायकाला चित्रपटाचे प्रेरणास्थान मानले जाते.

हेही वाचा - Poster Boys 2 : 'पोस्टर बॉईज'च्या सिक्वेलसाठी श्रेयस तळपदेने घेतले सिद्धिविनायकाचे आशीर्वाद...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.