ETV Bharat / entertainment

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची तारीख झाली फायनल... - परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा

परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांनी त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. हे जोडपे कधी आणि कुठे सात फेरे घेणार हे जाणून घेण्यासाठी वाचा....

Parineeti Chopra and Raghav Chadha
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा
author img

By

Published : Aug 20, 2023, 6:57 PM IST

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी जेव्हापासून त्यांचे नाते अधिकृत केले तेव्हापासून ते खूप चर्चेत आले आहेत. या जोडप्याने बऱ्याच दिवसांपासून आपले नाते गुपित ठेवले होते. दरम्यान, साखरपुडा झाल्यानंतर या जोडप्याने आपले नाते जगासमोर ठेवले. आता परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्याची बातमी समोर येत आहे. दरम्यान परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची एंगेजमेंट नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये १३ मे रोजी झाली होती. या साखरपुड्यात बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रासह इतर काही प्रसिद्ध लोकही सहभागी झाले होते. एंगेजमेंटनंतर, परिणीतीचे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे.

लवकरच लग्नबंधनात अडकणार : मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे याच वर्षी २५ सप्टेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र, लग्नाच्या तारखेबाबत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. याशिवाय लग्नाच्या सुमारे १० दिवस आधी हे कपल सर्व तयारी सुरू करेल असे माहित झाले आहे. या लग्नात कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, खास मित्र आणि बॉलिवूड इंडस्ट्रीपासून तर राजकारणापर्यंतचे लोक उपस्थित राहू शकतात. दरम्यान, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे राजस्थानमध्ये लग्न करू शकतात, अशा बातम्याही येत आहेत. कारण यापूर्वी हे जोडपे त्यांच्या भव्य लग्नासाठी ठिकाण शोधत होते. प्रियांकाप्रमाणेच परिणीतीही शाही पद्धतीने लग्न करणार आहे.

लग्न होणार भव्य : परिणीती आणि तिच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. हे एक भव्य लग्न असेल. परिणीती आणि तिच्या कुटुंबीयांनी लग्नाबाबत मौन बाळगले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती तिच्या लग्नाची तयारी सुरू करणार आहे. लग्नानंतर गुरुग्राममध्ये भव्य रिसेप्शन होणार आहे. परिणीती आणि राघव हे कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. या जोडप्याने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, तेव्हा ते रिलेशनशिपमध्ये नव्हते. 'चमकिला' चित्रपटाच्या शुटिंगपासून त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. राघव हे शुटिंग सेटवर परिणीतीला भेटायला जात होते. वर्षानुवर्षे डेटिंग केल्यानंतर या जोडप्याने आपले नाते अधिकृत केले.

हेही वाचा :

  1. Gadar 2 Collection : 'गदर २'ने गाठले कमाईचे शिखर; केली 'इतकी' कमाई....
  2. Anasuya Bharadwaj : सोशल मीडियावर अनसूया भारद्वाजची पोस्ट झाली व्हायरल...
  3. Jailer box office collection day 10 : 'जेलर' चित्रपटाने १० दिवसात केली बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.