अमृतसर (पंजाब) - अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा विवाहा आधी दोघेही शुक्रवारी रात्री अमृतसर विमानतळावर एकत्र दिसले. मिळालेल्या माहितीनुसार हे जोडपे श्री हरमंदिर साहिब येथे दर्शनासाठी जाण्यासाठी आले होते. यावेळी परिणीतीने बेज रंगाचा कुर्ता घातला होता तर राघवने कुर्ता-पायजामा नेहरू कोट घातलेला होता.
आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढाशी असलेल्या संबंधांमुळे परिणीती गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होती. या जोडप्याने १३ मे रोजी नवी दिल्लीतील त्यांच्या कपूरथला येथील घरी जवळचे नातेवाईक व प्रियजनांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. राघव आणि परिणीती या दोघांनी बराच काळ त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले होते.
![Parineeti and Raghav potted](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/01-07-2023/18887300_1.jpg)
परिणीती आणि राघव एकमेकांना डेटिंग करायला सुरुवात करण्यापूर्वी अनेक वर्षांपासून ओळखत होते. या जोडप्याला अलीकडेच लग्नासाठी उदयपूरमधील ठिकाणे शोधताना पाहण्यात आले होते. दोघेही राजस्थानमध्ये लग्नाच्या बंधनात तिची चुलत बहीण प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या पावलावर पाऊल टाकतील. या लग्नाबद्दलचे सर्व तपशील अद्यापही गुलदस्त्यात आहेत. या विवाहाला राजकीय आणि सिनेक्षेत्रातील दिग्गज व्यक्ती हजर राहतील. त्यामुळे याबद्दलचे सर्व तपशील उघड करण्यात आलेले नाहीत. दोघांच्या दिल्लीतील साखरपुड्याला परिणीतीची बहिण प्रियांका चोप्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह हाय प्रोफाईल सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यामुळे लग्नातही मोठ्या संख्यने व्हिव्हिआयपी हजर राहतील यात शंका नाही. २०२३ या वर्षातील हा एक भव्य नेत्रदिपक लग्नसोहळा असेल अशी अटकळ बांधली जात आहे. यावेळी प्रियांकासह तिचा पती निक जोनासही लग्नाला हजेरी लावू शकतो.
![Parineeti and Raghav potted](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/01-07-2023/18887300_2.jpg)
दरम्यान, वर्क फ्रंटवर, परिणीती चोप्रा शेवटची सूरज बडजात्याच्या उंचाईमध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्यासोबत दिसली होती. 'चमकिला'मध्ये ती दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट अमरजोत कौर आणि अमर सिंग चमकीला या दोन प्रसिद्ध पंजाबी गायिकांभोवती फिरतो.
हेही वाचा -
१. The Night Manager 2 : एक दिवस आधीच ओटीटीवर आला अनिल कपूरचा द नाईट मॅनेजर २