ETV Bharat / entertainment

Ragneeti Wedding : लग्नसोहळ्यातील परिणीती-राघवचा पहिला फोटो आला समोर; शेअर करताच केले डिलीट - मनोरंजन आणि राजकारणातील बड्या व्यक्ती

Ragneeti Wedding : परिणीती-राघव यांचा लग्नसोहळा आज उदयपूरमध्ये होतोय. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या संगीत सोहळ्यातील फोटो समोर आलेत. हे फोटो शेअर केल्यानंतर लगेच पेजवरून काढून टाकण्यात आलेत.

Ragneeti wedding
परिणीती राघवचा पहिला फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 1:38 PM IST

उदयपूर(राजस्थान) : Ragneeti Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आज (24 सप्टेंबर) उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये 'आप' नेते राघव चढ्ढा यांच्यासोबत सात फेरे घेणार आहे. चुडा, हळदी आणि संगीत समारंभानंतर परिणीती राघवची होणार आहे. या लग्नाला हजेरी लावण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीज आणि राजकारणातील बड्या व्यक्ती लीला पॅलेसमध्ये पोहोचल्या आहेत. सर्व पाहुण्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. काल परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा संगीत सोहळा पार पडला. त्यातील फोटो आता समोर आले आहेत. संगीत सेरेमनीमधील फोटोत परिणीती आणि राघव हे कप्ल सुंदर दिसत होते.

नवराज हंसनं शेअर केले फोटो : परिणीती-राघवच्या संगीत सेरेमनीमध्ये आलेल्या गायक नवराज हंसनं त्याच्या सोशल मीडिया पेजवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नवराज परिणीती-राघव या शाही जोडप्यासोबत संगीत सेरेमनीमध्ये पोज देताना दिसत आहे.

कप्लला दिल्या शुभेच्छा : हे फोटो शेअर करत नवराजनं लिहिलं आहे, या कप्लचं अभिनंदन, तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलेले आहात, परिणीती चोप्रा जी आणि राघव चड्ढा जी, तुमचं वैवाहिक जीवन सुखी जावो, तुमच्यासोबत संगीत सोहळ्यात परफॉर्म करण्यास रेडी आहे. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा, माझ्यासाठी ही एक मोठी संधी आहे, देव तुम्हा जोडप्याला आशीर्वाद देईल. दरम्यान, फोटो व्हायरल झाल्याची बातमी मिळताच नवराजनं आपल्या इन्स्टा वॉलवरून हे फोटो हटवले आहेत.

परिणीती-राघवच्या लग्नाचं वेळापत्रक :

  • दुपारी 1 - सेहराबंदी
  • दुपारी 2 - मिरवणूक
  • दुपारी ३.३०- जयमाला
  • दुपारी ४- फेरे
  • संध्याकाळी 6.30- परिणीती चोप्राचा निरोप
  • रात्री 8.30 - शाही मेजवानी

रागनिती' असं जोडीचं टोपण नाव : राघव आणि परिणीतीच्या नावातील अक्षरांचा मेळ घालून 'रागनिती' असं त्यांच्या जोडीला टोपण नाव देण्यात आलंय. तर या रागनितीच्या विवाहाचं संपू्र्ण वेळापत्रक तयार आहे. या भव्य सोहळ्याला शनिवारी सुरुवात झाली होती.

हेही वाचा :

  1. Parineeti Raghav Chadha wedding: रागनिती विवाहाला चुरा समारंभाने सुरुवात, ९० च्या दशाकतील संगीतात रंगणार संध्याकाळ
  2. Kangana Ranaut reacts to BJP MP : रमेश बिधुरींच्या वक्तव्यावर कंगना रणौतची प्रतिक्रिया: 'कुणीही मर्यादेचं उल्लंघन करु नये'
  3. Rashmika Mandanna Animal first look : रणबीरच्या अ‍ॅनिमलमधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक, भेटा गीतांजलीला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.