मुंबई - यशराज फिल्म्सचे निर्माता आदित्य चोप्रा यांच्या मातोश्री आणि दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पमेला चोप्रा यांचे गुरुवारी निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यशराज फिल्म्सच्या वतीने एका निवेदनाद्वारे त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे. पामेला चोप्रा यांच्या निधनाच्या वृत्ताने फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी या बातमीने व्याकुळ झाले. यशराज फिल्म्स ही कंपनी उभारण्यात आणि यशस्वी करण्यात निर्माते यश चोप्रा यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होत्या.
![दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-pamela-chopra-expired-mhc10001_20042023115740_2004f_1681972060_34.jpeg)
पमेला चोप्रा या काही दिवसापासून आजारी होत्या. गेली १५ दिवस त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करुन उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसापासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पमेला चोप्रा या यशराज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्रा आणि अभिनेता उदय चोप्रा यांच्या आई होत्या. यशराज फिल्म्सने एक निवेदन प्रसिद्ध करुन त्यांच्या निधनाची बातमी दिली. यात त्यांनी लिहिलंकी, 'चोप्रा कुटुंबीय अत्यंत जड अंतःकरणाने कळवत आहे की पामेला चोप्रा यांचे ७४ व्या वर्षी निधन झाले. मुंबईत सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुमच्या प्रार्थनेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि दुःखाच्या आणि चिंतनाच्या या क्षणी कुटुंब प्रायव्हसीची विनंती करत आहे.'
-
My thoughts & prayers are with Adi, Rani, Uday and all members of the Chopra family in their hour of grief. RIP respected Pam Chopra Ji🙏 🕉️ Shanti pic.twitter.com/IImLMDT6Q6
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">My thoughts & prayers are with Adi, Rani, Uday and all members of the Chopra family in their hour of grief. RIP respected Pam Chopra Ji🙏 🕉️ Shanti pic.twitter.com/IImLMDT6Q6
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 20, 2023My thoughts & prayers are with Adi, Rani, Uday and all members of the Chopra family in their hour of grief. RIP respected Pam Chopra Ji🙏 🕉️ Shanti pic.twitter.com/IImLMDT6Q6
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 20, 2023
पमेला चोप्रा या यशराज फिल्म्समध्ये पती यश चोप्रांसोबत काम करत होत्या. त्यांनी अनेक चित्रपटांच्या कथा लेखक, ड्रेस डिझायनर आणि गायिका म्हणूनही काम केले आहे. यश चोप्रा यांच्या गाजलेल्या कभी कभी' या चित्रपटाची कथा त्यांनीच लिहिली होती. 1981 च्या गाजलेल्या सिलसिला चित्रपाटसाठी त्या ड्रेस डिझायनर म्हणून काम करत होत्या. चांदनी या गाजलेल्या चित्रपटातील 'मैं ससुराल नही जाउंगी' आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटातील 'घर आजा परदेसी' ही गाणी त्यांनी गायली आहेत.
हेही वाचा - Nick Jonas King : देशीसह विदेशी गाण्याचा तडका, निक जोनासचे किंगबरोबरील गाण्याचा टीझर झाला रिलीज