मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध अतिशय तणावाचे आहेत. पाककडून सतत कुरापती काढल्या जातात. भारतात होणाऱ्या अनेक हिंसक कारवायांच्या मागे पाकिस्तानी अतिरेकी असतात हे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे क्रिकेट दौरे या दोन संघामध्ये गेल्या दशकापासून होत नाहीत. शिवाय पाकिस्तानी चित्रपट भारतात रिलीज झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर द लिजेंड ऑफ मौला जट हा पाकिस्तानी चित्रपट भारतात रिलीज होणार आहे.
हा चित्रपट रिलीज होतोय म्हटल्यानंतर त्याला विरोध होणे सुरू झाले आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी द लिजेंड ऑफ मौला जट हा पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात कुठल्याही थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही, असा ठाम निर्धार केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन व पोस्ट लिहून आपली भूमिका सांगितली आहे.
-
१)पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध *आहे म्हणजे आहे.*
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
यापूर्वी जो चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, तो पाकिस्तानी चित्रपट आता ३० डिसेंबरला येतोय. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार *नाही म्हणजे नाही*
">१)पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध *आहे म्हणजे आहे.*
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 28, 2022
यापूर्वी जो चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, तो पाकिस्तानी चित्रपट आता ३० डिसेंबरला येतोय. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार *नाही म्हणजे नाही*१)पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध *आहे म्हणजे आहे.*
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 28, 2022
यापूर्वी जो चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, तो पाकिस्तानी चित्रपट आता ३० डिसेंबरला येतोय. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार *नाही म्हणजे नाही*
अमेय खोपकर यांनी याबाबत दोन ट्विट केली आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, ''पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध *आहे म्हणजे आहे.* यापूर्वी जो चित्रपट २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, तो पाकिस्तानी चित्रपट आता ३० डिसेंबरला येतोय. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार *नाही म्हणजे नाही*''
-
२)थिएटरमालकांना नम्र आवाहन - मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केलीत, त्याची तोडफोड किंवा त्याचं नुकसान होईल असं कृत्य करु नका.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
अमेय खोपकर
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना
उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
">२)थिएटरमालकांना नम्र आवाहन - मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केलीत, त्याची तोडफोड किंवा त्याचं नुकसान होईल असं कृत्य करु नका.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 28, 2022
अमेय खोपकर
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना
उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना२)थिएटरमालकांना नम्र आवाहन - मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केलीत, त्याची तोडफोड किंवा त्याचं नुकसान होईल असं कृत्य करु नका.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 28, 2022
अमेय खोपकर
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना
उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
दुसऱ्या ट्विटमध्ये खोपकर लिहितात, ''थिएटर मालकांना नम्र आवाहन - मोठ्या मेहनतीने जी इमारत तुम्ही उभी केलीत, त्याची तोडफोड किंवा त्याचं नुकसान होईल असं कृत्य करु नका.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अमेय खेपकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी या चित्रपटाला मनसे कडाडून विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले. मल्टीप्लेक्समधील काचा व पडदे महाग असतात, असे सूचित करत त्यांनी थिएटर मालकांना स्पष्ट धमकी दिली आहे.
पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खान स्टारर द लिजेंड ऑफ मौला जट चित्रपट जगभरात सोकप्रियता मिळवत आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आणि आतापर्यंत या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अमेरिका, युरोप आणि आखाती देशांमध्येही या चित्रपटाची जादू चालली असून या देशांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट पहिला पाकिस्तानी चित्रपट ठरला आहे. भारतात या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच क्रेझ आहे. आता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
काय आहे या चित्रपटाची कथा? - हा चित्रपट ४१ वर्षीय दिग्दर्शक बिलाल लाशारी यांनी दिग्दर्शित केला आहे. 'द लिजेंड ऑफ मौला जट' ची कथा मौला जट आणि गँग लीडर नूरी नट (हमजा अली अब्बासी) यांच्यातील वैरावर आधारित आहे. मौला जट हा पंजाबचा सर्वात भयंकर योद्धा आहे आणि तो नूरीचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे. ही कथा त्याच्या कुटुंबाच्या सन्मानाची आणि न्यायाची आहे, ज्यामध्ये खूप भावना आणि नाटकही पाहायला मिळत आहे. शेवटी, हा वाद संपवून मौला जट सुधारतो.'द लिजेंड ऑफ मौला जट' या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये फवाद खान आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय हमजा अली अब्बासी, हुमायमा मलिक, मिर्झा गौहर रशीद, फारिस शफी, अली अजमत, नय्यर एजाज, शफकत चीमा, राहिला आगा, जिया खान आणि सायमा बलोच आपापल्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक, पटकथा, डीओपी आणि संपादक बिलाल लशारी आहेत आणि चित्रपटाची निर्मिती अली मुर्तझा, बिलाल लशारी आणि अम्मारा हिकमत यांनी केली आहे.
हेही वाचा - बेशरम रंग वाद: थिएटर रिलीजपूर्वी चित्रपट आणि गाण्यांमध्ये बदल करण्याचा सेन्सॉर बोर्डाचा सल्ला