ETV Bharat / entertainment

Pakistan Actress Mahira Khan Wedding : 'रईस' फेम पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा लग्नाच्या बेडीत, व्हायरल झाले फोटो - सलीम करीम

Pakistan Actress Mahira Khan Wedding : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खाननं नुकतेच दुसरे लग्न केलं आहे. माहिराच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Pakistan Actress Mahira Khan Wedding
माहिरा खानचं लग्न
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 11:26 AM IST

मुंबई - Pakistan Actress Mahira Khan Wedding : पाकिस्तानमधील प्रसिध्द अभिनेत्री माहिरा खान ही नेहमीच चर्चेत असते. लॉलीवूडपासून बॉलिवूडमध्ये काम केलेल्या माहिराची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. दरम्यान आता माहिराबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. 38 वर्षीय माहिरा खाननं रविवारी बॉयफ्रेंड सलीम करीमसोबत लग्न केलं. आता सध्या सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. या पाकिस्तानी वेडिंगमधील माहिराचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. माहिरा आणि सलीम करीम हे दोघे खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. यांच्या लग्नाच्या चर्चाही बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. अखेर माहिरानं तिचा लाईफ पार्टनर निवड करून तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

सलीम करीम भावूक झाले : माहिरा खानच्या लग्नामधील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती लेहंग्यामध्ये दिसत आहे. माहिरा ही पांढऱ्या रंगाचा लेहेंगामध्ये खूप खास दिसत आहे. यासोबत तिनं यावर मॅचिंग चुनरी घेतली आहे. ज्यामुळे तिचा लूक आणखीनच सुंदर दिसत आहे. वराच्या लुकबद्दल सांगायचे तर, सलीम करीमनं काळ्या रंगाची शेरवानी घातली आहे. यावर त्यानं निळ्या रंगाची पगडी बांघली आहे. सलीम करीमनं जेव्हा माहिराला पाहिलं तेव्हा त्याचे डोळे पाणवले आहे. माहिरा त्याच्याकडे जेव्हा चालत येते तेव्हा तो तिची चुनरी उचलतो. त्यानंतर सलीम हा माहिराच्या कपाळाचे किस घेत तिला मिठी मारतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वजण टाळ्या वाजवू लागतात.

कोण आहे माहिराचा नवरा सलीम? : 'रईस' या बॉलीवूड चित्रपटातून सुपरस्टार शाहरुख खानसोबत पदार्पण करणाऱ्या माहिराचा पती सलीम करीम हा पाकिस्तानी स्टार्टअप सिंपैसाचा सीईओ आहे. सलीम हा एक उद्योजक असण्यासोबतच, एक डीजे देखील आहे. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. माहिरा खाननं 2007 मध्ये अली अस्करीसोबत लग्न केले होते. माहिराचे अलीसोबतचे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगा अझलन आहे. माहिर सिंगल ही पॅरेंट आहे. माहिरा आणि सलीम काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत, 2022 मध्ये जेव्हा माहिराला त्यांच्या डेटिंगबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने लाजून होकार दिला. आता अखेर 2023 मध्ये माहिराने सलीमसोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली.

चाहत्यांन केलं अभिनंदन : या नव्या सुरुवातीसाठी चाहते सोशल मीडियावर माहिराचे अभिनंदन करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहले, 'तुला पाहून खूप आनंद झाला, ज्या महिला पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा विचार करतात त्यांच्यासाठी ही आशा आहे'. तर दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'अभिनंदन, अल्लाह तुम्हाला सुंदर वैवाहिक आयुष्य देवो.' आणखी एका चाहत्यानं कमेंट केली की, 'तू खूप सुंदर दिसत आहेस'. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहे. या पोस्टवर अनेकजण हार्ट इमोजी पोस्ट करत आहे.

हेही वाचा :

  1. Thalaivar 170 : 'थलैवर 170'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या टीमबाबत केली घोषणा...
  2. Kannada Actor Nagabhushana Arrested : साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागभूषणला झाली अटक...
  3. Parineeti Chopra Choora Ceremony : प्रियांका चोप्राची आई मधू यांनी परिणीतीच्या चुडा सेरेमनीचे फोटो केले शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.