मुंबई - Koffee With Karan Season 8 : निर्माता करण जोहरचा सर्वात लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण सीझन 8' चा नवीन एपिसोड सध्या खूप चर्चेत आहे. यावेळी करणनं शोमध्ये बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांना आमंत्रित केलं आहे. या शोमध्ये अजयनं करणच्या प्रश्नाची उत्तर मजेशीर दिली. 'कॉफी विथ करण'चा हा एपिसोड खूप वेगळा असणार आहे. या शोच्या संवादादरम्यान अजय देवगण नेपोटिझमवर देखील भाष्य केलं आहे. अजयनं नेपोटिझमवर आपले मत मांडताना म्हटलं, ''तुम्ही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित असाल किंवा नसाल, संघर्ष हा प्रत्येकासाठी समान असतो. प्रत्येकाला तितकेच कठोर परिश्रम करावे लागतात. आजही आम्ही खूप मेहनत करतो, पण लोकांना हे दिसत नाही. काही लोकांना वाटते की आम्हाला सर्व काही अगदी सहज मिळाले आहे''.
रोहित शेट्टीच्या संघर्षाबद्दल मत मांडलं : यानंतर अजय रोहित शेट्टीकडे बोट दाखवत म्हणतो की, याचा संघर्ष पाहा, जेव्हा तो इंडस्ट्रीत नवीन होता, तेव्हा तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्यावेळी रोहितकडे जेवणासाठी पैसे नसत. पण आज जेव्हा तो बॉलीवूडचा मोठा दिग्दर्शक बनला आहे, तेव्हा लोकांना वाटते की, त्यानं काही मेहनत घेतली नसेल. 'कॉफी विथ करण सीझन 8'मध्ये अजय देवगणनं त्याचे वडील वीरू देवगणबद्दलही अनेक खुलासे केले. सध्या 'कॉफी विथ करण 'चा प्रोमो करण रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये करण हा अजय आणि रोहितला प्रश्न विचारताना दिसत आहे.
अजय देवगणचं वर्क फ्रंट : अजयच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच त्याच्या सिंघम फ्रँचायझी 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये अजयशिवाय करीना कपूर खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, आणि अक्षय कुमार आणि इतर कलाकार आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचं दिवशी साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' रिलीज होईल. या चित्रपटांमध्ये रुपेरी पडद्यावर जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :