ETV Bharat / entertainment

Nushrratt Bharuccha : युद्धग्रस्त इस्रायलमधून परतल्यानंतर नुसरत भरुचानं पहिला व्हिडिओ केला शेअर ; भारत सरकारचे मानले आभार... - इस्रायलहून परतल्यानंतर नुसरतनं केला व्हिडिओ शेअर

Nushrratt Bharuccha : हमासनं इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी सकाळी हल्ला केला होता. यावेळी अभिनेत्री नुसरत भरुचा ही इस्रायलमध्ये अडकली होती. दरम्यान आता ती मायदेशी परतली आहे. त्यानंतर तिनं एक सोशल मीडियावर एक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिनं इस्रायलमधील परिस्थितीचे वर्णन केले आहे.

Nushrratt Bharuccha
नुसरत भरुचा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 1:39 PM IST

मुंबई - Nushrratt Bharuccha : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं 7 ऑक्टोबर रोजी अचानक इस्रायलवर हल्ला केला, ज्यात शेकडो निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय अनेक लोकही याठिकाणी अडकले आहेत. इस्रायलमध्ये युद्धाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अभिनेत्री नुसरत भरुचाचे नावही या यादीत सामील झाले आहे. आता नुसरत भारतात सुखरूप परतली. नुसरत रविवारी दुपारी दोनच्या सुमारास मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडताना दिसली. यावेळी ती खूपच घाबरलेली दिसली होती. दरम्यान आज नुसरतनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं इस्रायलमधील परिस्थिती सांगितली आहे.

इस्रायलहून परतल्यानंतर नुसरत भरुचानं केला व्हिडिओ शेअर : व्हिडिओमध्ये नुसरत भरुचानं सांगितलं, 'ज्यांनी माझ्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली त्या सर्वांचे मला आभार मानायचे आहेत. मी परत आलो आहे. मी घरी आहे. मी सुरक्षित आहे. मी ठीक आहे! पण दोन दिवसांपूर्वी जेव्हा मी हॉटेल तेल अवीवच्या खोलीतून जागे झाले, तेव्हा मला फक्त बॉम्ब पडण्याचा आणि लोकांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर आम्हाला तातडीने तळघरात नेण्यात आले. याठिकाणी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद होते. मी याआधी अशा परिस्थितीत कधीच नव्हते, पण आज जेव्हा मला माझ्याच घरात जाग आला. तेव्हा कोणताही आवाज नाही, कोणतीही भीती न बाळगण्याचे कारण नाही. याशिवाय जवळ कोणताही धोका नसल्याची भावना ही होती. या गोष्टीची मला जाणीव झाली आहे. आपण किती भाग्यवान आहोत, आपण अशा देशात आहोत जिथे आपण सुरक्षित आणि संरक्षित आहोत. आपण थोडा वेळ काढून भारत सरकारचे आभार मानले पाहिजेत. भारतीय दूतावास आणि इस्रायल दूतावासाचे आभार मानले पाहिजेत. ज्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षितपणे राहू शकतो. मी खूप भाग्यवान आहे की मी या देशात आहे, आपल्याला आपल्या देशाचा अभिमान असायला हवा.

गाझा पट्टीवर भयंकर युद्ध सुरू : व्हिडीओशिवाय नुसरतनं तिच्या इंस्टाग्रामवर एक लांबलचक स्टेटमेंट देखील जारी केले आहे, ज्यामध्ये तिने स्वतःच्या नजरेनुसार इस्रायलची स्थिती देखील वर्णन केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलमध्ये आतापर्यंत सुमारे 900 लोकांना हल्ल्यांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर पॅलेस्टिनीला दिले आहे. गाझा पट्टीवर भयंकर युद्ध सुरू आहे. इस्रायलनं फक्त गाझा पट्टीवरच नाही तर लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहवरही हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं हल्ले सुरू केले आहेत. या युद्धात दोन्ही बाजूंचे सुमारे 1600 लोक मरण पावले आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा :

  1. Happy Birthday Amitabh Bahchchan : बच्चन कुटुंबात सर्वाधिक कमाई बिग बीची, अभिषेक आणि ऐश्वर्याला टाकले मागे
  2. Mahadev App and Lion Book App Case : महादेव ॲपनंतर ईडीच्या रडारवर लायन बुक ॲप; 'या' बॉलिवूड कलाकारांची सुरू आहे चौकशी
  3. Mia khalifa : मिया खलिफालाही इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा फटका; नोकरी गेली ना तिची..!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.