मुंबई - Fighter : हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर स्टारर चित्रपट 'फाइटर' या वर्षातील सर्वात प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात हृतिक आणि दीपिका पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसेल. सध्या या चित्रपटाचं शूटिंग इटलीमध्ये सुरू आहे. या चित्रपटामधील दोन गाणी इथं शूट होणार आहेत. दरम्यान आता 'फायटर' चित्रपटाच्या सेटवरुन दीपिका आणि हृतिकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये हृतिक आणि दीपिकासह दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद, कोरिओग्राफर बॉस्को मार्टिससोबत आणखी काहीजणं दिसत आहे. या फोटोमध्ये सर्वजणं फोटोसाठी पोझ देत आहेत.
फायटरची शूटिंग : फायटरच्या शूटिंगदरम्यान इटलीमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, सिद्धार्थ आनंद, ममता आनंद, बॉस्को मार्टिस आणि इतर काहीजणं मजा करताना दिसत आहेत. याशिवाय हृतिक हा सेल्फी घेताना दिसत आहे, तर दीपिका त्याच्या शेजारी सेल्फीसाठी पोझ देत आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ आनंद, ममता आनंद, बॉस्को मार्टिस यांच्यासोबत टेबलाभोवती अनेकजण बसलेले आहेत. हे सर्व एकत्र कॉफीचा आनंद लुटत आहेत. या फोटोमध्ये हृतिकनं निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा हुडी घातला आहे, तर दीपिकानं पांढऱ्या रंगाचा आउटफिट आणि काळ्या रंगाची चप्पल परिधान केली आहे. फोटोमध्ये दोघंही खूप देखणे दिसत आहेत.
इटलीमध्ये होणार फायटरमधील दोन गाणे शूट : दरम्यान, हृतिक आणि दीपिका इटलीमध्ये दोन गाण्यांचे शूटिंग करणार आहेत. यापैकी एक गाणं घुंघरू फ्रॉम 'वॉर'च्या फूट-टॅपिंग डान्स नंबरच्या पार्श्वभूमीवर असेल. मिळालेल्या माहितीनुसार 'विशाल आणि शेखर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. हे गाणं लॉन्च होताच चर्चेत येईल. या गाण्याची कोरिओग्राफ बॉस्कोनं केली आहे. गाण्यात डान्स नंबरमध्ये अनेक हुक स्टेप्स असणार आहे. या गाण्याच्या 5 दिवसांच्या शूटिंगनंतर हृतिक आणि दीपिका दुसऱ्या गाण्याच्या शूटिंगसाठी इटलीतील दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत. 'फायटर' चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटामध्ये हृतिक हा अॅक्शनमोडमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :