ETV Bharat / entertainment

Chinmayi reacts to Kamal Haasans tweet: दिल्लीतील कुस्तीपटूंना समर्थन करणाऱ्या कमल हासनवर चिन्मयी श्रीपादची टीका - दिल्लीतील कुस्तीपटूंना समर्थन

अभिनेता कमल हासनने दिल्लीत आंदोलन करत असलेल्या महिला कुस्तीपटूंसाठी समर्थन केले. त्यानंतर तमिळ गायिका चिन्मयी श्रीपादने कमल हासनवर टीका केली आहे. एका महिलने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यानंतर तिच्यावर पाच वर्षे फिल्म इंडस्ट्रीत बंदी आहे, तिच्या बद्दल का बोलत नाही असा सवाल तिने कमल हासन यांना केला.

Chinmayi reacts to Kamal Haasans tweet
कमल हासनवर चिन्मयी श्रीपादची टीका
author img

By

Published : May 26, 2023, 3:33 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेता कमला हासन यांनी कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या महिला कुस्तीपटूंच्या निषेधाला पाठिंबा दर्शवला. यासाठी त्यांनी एक ट्विट करत कुस्तीपटूंना समर्थन दिले. यानंतर तमिळ गायिका चिन्मयी श्रीपादने आपल्यावर बंदी घालण्यात आली तेव्हा कमल हासन गप्प का होते अशी त्यांच्यावर टीका केली आहे.

कमल हासन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते, 'आज कुस्तीपटूंच्या विरोधाला १ महिना होऊन गेला. राष्ट्राच्या सन्मानासाठी लढणाऱ्यांना आपण स्वतःच्या सुरक्षेसाठी लढण्यासाठी भाग पाडले आहे'. कमल हासन यांनी पुढे लििले की, 'भारतीय नागरिकांनो, आपण कुणाकडे लक्ष देण्यासाठी पात्र आहोत, आपले राष्ट्रीय क्रिडावीर की गुन्हेगारी इतिहास असलेले राजकारणी?'

  • 5 years of a singer in Tamilnadu being banned for naming a molester right in front of their eyes and not a pip about it since the poettu has their respect.

    How does one trust politicians who speak for women’s safety while they ignore harassment right under their noses?

    Just.… https://t.co/RLrQiuPlgT

    — Chinmayi Sripaada (@Chinmayi) May 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कमल हासन यांच्या ट्विटनंतर गायिका चिन्मयी श्रीपादने एक ट्विट करत कमल हासन यांना काही प्रश्न विचारले आहेत. तिने लिहिले की, 'पाच वर्षापासून एक तामिळनाडूतील गायिकेवर बंदी आहे, कारण तिने लैंगिक शोषण करणाऱ्याचे बिंग फोडले होते. त्यावेळी कोणही ब्र काढला नाही. महिला सुक्षेवर भाष्य करणाऱ्यावर कोणी कसे विश्वास ठेवायचे, जेव्हा ते त्यांच्या नाकाखाली होत असलेल्या लैंगिक शोषणाकडे दुर्लक्ष करतात. आता माझ्या या पोस्टवर भरपूर शिव्या योतील, म्हणून मी जात आहे.'

गायिका चिन्मयी श्रीपादाने कमल हासनला त्याच्या ट्विटचा हवाला देऊन प्रश्न केला की, तिने तिच्यावर विनयभंग करणाऱ्याचे नाव देऊन तिला संगीत व्यवसायातून काढून टाकले. यावर हासन यांनी मौन बाळगत कधी प्रतिक्रिया का दिली नाही. गायिकाने सांगितले की, तमिळ गीतकार वैरामुथू यांनी व्यवसायाच्या भेटीदरम्यान तिचा लैंगिक छळ केला होता आणि भारतातील मी टू चळवळीदरम्यान ती गप्प न बसल्यास तिची कारकीर्द संपुष्टात आणण्याची धमकी दिली होती.

चिन्मय श्रीपाद मीटू चळवळीतील आरोप - चिन्मयी श्रीपाद या गायिकेने 2018 मध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची गोष्ट मीटू चळवळीच्या दरम्यान सांगितली होती. चिन्मयी ही तमिळा गायिकांमधील आघाडीची कलाकार आहे. जेव्हा ती आणि गीतकार वैरामुथू स्वित्झर्लंडमध्ये विझ्हामट्टॉम कॉन्सर्टसाठी गेले असताना 2005 मध्ये तिने त्याच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. वैरामुथूने दाव्यांवर विवाद करणारे विधान जारी केल्यानंतर, चिन्मयीने त्याला खोटारडे म्हणून प्रत्युत्तर दिले होते. वैरामुथू विरुद्धच्या दाव्यांमुळे चिन्मयीला दक्षिण भारतीय सिने, टेलिव्हिजन कलाकार आणि डबिंग आर्टिस्ट युनियनमधून बंदी घालण्यात आली होती. तिची मनाई अजून उठलेली नाही.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.