ETV Bharat / entertainment

NMACC day 2: रणवीर सिंगसोबत थिरकणाऱ्या प्रियांकाला पाहून गौरी खान झाली आनंदीत - गौरी आणि प्रियांकाचे झाले होते भांडण

शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास यांच्यात भूतकाळातील कटू प्रसंग विसरुन सलोखा झाल्याचे दिसते. NMACC गाला रात्रीच्या दुसऱ्या दिवशी प्रियांका रणवीर सिंगसोबत गल्लन गुडिया गाण्यावर नाचत असताना गौरी खान आनंद घेताना दिसली.

प्रियांकाला पाहून गौरी खान झाली आनंदीत
प्रियांकाला पाहून गौरी खान झाली आनंदीत
author img

By

Published : Apr 3, 2023, 1:59 PM IST

मुंबई - नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर गालाच्या दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा स्टेजवर नृत्य करत असताना त्याचा आनंद गौरी खान घेताना दिसत आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उत्सवाच्या पहिल्या दिवशी, अभिनेत्री प्रियांका चोप्रा चित्रपट निर्माता करण जोहरला मिठी मारताना दिसली होती. दुसऱ्या दिवशी, प्रियंका तर रणवीर सिंगसोबत त्यांच्या दिल धडकने दो (२०१५) या चित्रपटातील गल्लन गुडिया गाण्यावर थिरकताना पाहताना गौरी खान चिअर्स करत होती.

प्रियांकावरुन करणवर टीका - बॉलिवूडमध्ये राजकारण असून त्यामुळेच प्रियंकाला देश सोडून हॉलिवूडची वाट धरायला लागली अशा प्रकारचा थेट आरोप कंगना रणौत आणि इतरांनी करण जोहरवर केला होता. या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये प्रियांका तिच्या दिल धडकने दो सहकलाकार रणवीर सिंगसोबत स्टेजवर नाचताना दिसत आहे. रणवीरने तिच्या परफॉर्मन्सच्या शेवटी प्रियांकाच्या गालावर किस केले होते.

प्रियांकाचे नृत्य- गर्दीत उभं राहून प्रियांका आणि रणवीरचे नृत्य पाहणारी गौरी खानचा फोटो यात सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहे. तिच्यासोबत तिच्या जिवलग मैत्रिणी भावना पांडे आणि नीलम कोठारी सोनी होत्या. भूतकाळातील समस्या असूनही या प्रसंगी हा ग्रुप मजा करत असल्याचे दिसून आले.

गौरी,प्रियांकाचे भांडण - काही दिवसापूर्वी करण जोहरला तिच्या पॉडकास्टनंतर प्रियांकाला बॉलिवूडपासून दूर नेल्याचा आरोपाने ट्रोलने करण्यात आले होते. दरम्यान, गौरीसोबतचे तिचे कुप्रसिद्ध भांडणही इंटरनेटवर पुन्हा चर्चेत आले होते. प्रियांकाने तिच्या पॉडकास्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु चाहत्यांनी असे गृहीत धरले की ती करण जोहर आणि गौरी खानसोबतच्या तिच्या 2012 च्या भागाचा संदर्भ देत आहे.

प्रियांका करणमध्ये समेट - त्यावेळी प्रियांका आणि शाहरुखचे अफेअर असल्याची चर्चा नव्याने रंगली होती. गौरी, तिचे मित्र आणि करण यांनी प्रियांकाला पार्ट्यांमध्ये या मुद्द्यावरून त्रास दिल्याचे वृत्त आहे. तथापि, करणने नंतर या दाव्यांचे खंडन केले, आणि त्यांनी त्यांच्या मतभेदांमध्ये समेट केला, ज्याचा पुरावा NMACC कार्यक्रमात त्यांचे पुनर्मिलन आहे. दोघांच्यात आता कोणताही वाद नसल्याचे त्यांच्या गळाभेटीवरुन दिसले होते.

हेही वाचा - American Model Gigi Hadid : अमेरिकन मॉडेल गिगी हदीदने शेअर केले तिच्या पहिल्या मुंबई ट्रिपचे फोटो, पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.