ETV Bharat / entertainment

'मेगाबजेट'मध्ये बनणार 'रामायण', रणबीर कपूर 'राम' तर 'रावणा'च्या भूमिकेत ह्रतिक रोशन!! - रावणाच्या भूमिकेत ह्रतिक रोशन

पहिल्यांदाच बॉलिवूडचे दोन बलाढ्य सेलिब्रिटी एकाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. रामानंद सागर (Ramanand Sagar) यांचे रामायण हे आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय रामायण मानले जाते. अशा परिस्थितीत नितेश तिवारी रामायण मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. यासाठी त्याने हृतिक आणि रणबीरची (Hrithik and Ranbir) निवड केली आहे.

'मेगाबजेट'मध्ये बनणार 'रामायण'
'मेगाबजेट'मध्ये बनणार 'रामायण'
author img

By

Published : Jul 21, 2022, 5:38 PM IST

मुंबई - आमिर खानची भूमिका असलेला 'दंगल' चित्रपट बनवणारा दिग्दर्शक नितेश तिवारी पुन्हा एकदा त्याच्या चित्रपटाने खळबळ माजवण्याचा प्रयत्न करत आहे. मीडियानुसार, यावेळी नितेश रामायणाची कथा मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे या चित्रपटात हृतिक रोशन आणि रणबीर कपूर (Hrithik and Ranbir) भूमिका साकारणार आहेत. रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या रामायण या टीव्ही मालिकेने आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रियता मिळवली होती. आता याच विषयावर बनणाऱ्या रामायण या चित्रपटाचे बजेट 400 किंवा 500 कोटी रुपये नाही तर हा चित्रपट त्याहून अधिक मेगाबजेटमध्ये तयार होणार आहे.

एवढ्या कोटींमध्ये बनणार चित्रपट - डॅशिंग अभिनेता हृतिक रोशन आणि आकर्षक रणबीर कपूरसारखे दोन्ही देखणे कलाकार पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीरला राम तर हृतिक रोशनला रावणाची भूमिका देण्यात आली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी मीडियानुसार या चित्रपटाचे बजेट 700 कोटींहून अधिक असल्याचे बोलले जात आहे.

कोण असेल सीता? - आता चित्रपटातील सीतेच्या भूमिकेचा शोध सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणला अप्रोच करण्यात आले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

रणबीर आणि हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर हृतिक रोशन विक्रम वेधा या आगामी चित्रपटात व्यग्र आहे. त्याचवेळी रणबीर कपूर त्याचा 'शमशेरा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. शमशेरा हा चित्रपट उद्या (२२ जुलै) जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा - 'डार्लिंग'च्या प्रमोशनमध्ये आलियाच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.