ETV Bharat / entertainment

निक जोनासने केला त्याच्या आवडत्या बॉलीवूड डान्स मूव्हचा खुलासा, प्रियांकानेही दिली प्रतिक्रिया - Nick Jonas Bollywood Moves

प्रियंका चोप्राचा पती निक जोनासने त्याच्या आवडत्या बॉलीवूड डान्स मूव्हचा खुलासा केला आहे. त्याला बॉलिवूड गाण्यावर डान्स करायला नेहमी आवडत असल्याचे तो म्हणाला. प्रियंका चोप्रानेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

निक जोनास
निक जोनास
author img

By

Published : Jun 6, 2022, 2:40 PM IST

मुंबई - प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांना अलिकडेच जानेवारी महिन्यात मुलगी झाली होती. त्यांनी आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियापासून दूर ठेवणेच पसंत केले आहे. दोघेही सोशल मीडियावर नेहमी एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त करीत असतात.

निक सध्या एका डान्स रिअॅलिटी शोला जज करत आहे आणि अलीकडेच जिमी फॉलन शोमध्ये त्याने बॉलिवूड संगीतावरील त्याचे प्रेम प्रकट केले आहे. पत्नी प्रियांका चोप्राने त्याला काही डान्स मूव्हज शिकवल्या आहेत आणि तो अनेकदा बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकणे पसंत करतो.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास

याबद्दल बोलताना निक म्हणाला, "माझी पत्नी भारतीय आहे. आम्ही बॉलिवूड संगीतावर भरपूर नृत्य करतो. मला असे वाटते की ते करणे सर्वात सोपे आहे. मी या स्टेप्स नेहमी करू शकतो. मी किंवा उभे राहून, मी ते करू शकतो आणि ते कसे करायचे ते मला माहीत आहे असे दिसते.''

तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ पुन्हा शेअर करताना, प्रियांकाने "ओह त्याला माहीत आहे..." असे लिहिले आणि प्रेमाने भरलेले इमोजी टाकले. चाहत्यांनी निकच्या त्याच्या सहज डान्स मूव्ह्सबद्दल कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. एका इंस्टाग्राम युजरने काही हृदय इमोजीसह "लव्हली नॅशनल जीजू" असे लिहिले.

प्रियांका चोप्रा इन्स्टा स्टोरी प्रतिक्रिया

दुसर्‍याने निकला बॉलीवूड प्रोजेक्ट करण्यास सांगितले आणि लिहिले "तुम्ही एक बॉलीवूड चित्रपट किंवा MV केला पाहिजे - ही एका भारतीय चाहत्याची इच्छा आहे! "

युजर्सच्या प्रतिक्रिया
युजर्सच्या प्रतिक्रिया

निकने बॉलिवूड संगीतावर प्रेम व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सुमारे एक महिन्यापूर्वी, इंस्टाग्रामवर लाइव्ह सत्र करताना, त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितले की त्याचे आवडते गाणे 'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपटातील 'बॉम डिग्गी डिग्गी' आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास

कामाच्या आघाडीवर, प्रियांका चोप्रा सध्या सिटाडेल या अमेझॉन प्राइम सीरिजचे चित्रीकरण करत आहे. या शोमध्ये गेम ऑफ थ्रोन्सचा अभिनेता रिचर्ड मॅडेन देखील आहे.

हेही वाचा - बर्थडे स्पेशल: नेहा कक्करची टॉप 7 गाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.