मुंबई: बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मोठा मुलगा हा करण देओल हा काही दिवसापूर्वी चर्चेत होता. आता तो पुन्हा एकदा करण हा चर्चेत आला आहे. गेल्या महिन्यात करणचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. करण देओलने १८ जून रोजी गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत विवाह केला. देओल कुटुंबाने करण-द्रिशाचे लग्न फार जल्लोषात साजरे केले होते. या लग्नात सनी आणि बॉबी देओलने आपल्या दोन्ही मुलांसोबत डान्स केला होता. दरम्यान करण देओल हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांचा नातू आहे. तसेच करणचे लग्न त्याच्या आजोबाकडेच पार पडले. सलमान खान व्यतिरिक्त सनीने आपल्या मुलाच्या लग्नात कोणत्याही मोठ्या स्टारला आमंत्रित केले नव्हते.
करण-द्रिशा मुंबई विमातळावर : दरम्यान काही दिवसापूर्वी करण-द्रिशा हनीमूनसाठी मनालीला गेले होते. यावेळी त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत होते. आता करण आणि -द्रिशा जवळपास तीन आठवड्यांनंतर त्यांच्या हनीमूनवरून परतले आहेत आणि हे जोडपे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. मुंबई विमानतळावर या कपलमध्ये खास ट्युनिंग पाहायला मिळाली. विमातळावर करण हा लाईट ग्रीन रंगाच्या आउटफिटमध्ये दिसला तर द्रिशा लाईट ब्लू रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. तसेच करणने यावेळी काळी बॅग खाद्यावर लटकवली होती. द्रिशा पांढरी बॅग घेवून चालताना दिसली.
चाहत्यांनी पोस्टवर केल्या कमेंट : हनीमून साजरा करून परतलेल्या या जोडप्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद यावेळी दिसत होता. त्याचबरोबर आता यूजर्स त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट देऊ लागले आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्याने लिहले 'फार सुंदर जोडी' दुसऱ्या चाहत्याने लिहले, खुप छान. काहीजणानी या पोस्टद्वारे द्रिशाला ट्रोल देखील केले आहे. एका यूजर्सने पोस्टमध्ये कमेंट करत लिहले की, 'ही तर आंन्टी सारखी दिसत आहे'. तर दुसऱ्याने लिहिले की 'हिचे वय तर ४० वर्षासारखे वाटत आहे'. याशिवाय करणपेक्षा द्रिशाचे वय जास्त आहे, असे देखील या पोस्टमध्ये म्हटले गेले आहे. त्याचबरोबर या नवविवाहित जोडप्याला अनेक चाहत्यांनी भरभरून आशीर्वाद दिला आहे.
हेही वाचा :