ETV Bharat / entertainment

Swara Bhasker Diwali : दिवाळीच्या आठवणीत रमली स्वरा भास्कर, शेअर केली उत्सवाची झलक - समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता फहाद अहमद

Swara Bhasker Diwali : बॉलिवूड सेलेब्रिटींनी दिवाळी सेलेब्रिशनला सुरुवात केल्यानंतर स्वरा भास्करनं आपल्या दिवाळीची झलक शेअर करणारा कोलाज शेअर केलाय. हे सुंदर क्षण हरवणार तर नाहीत याची तिला चिंता वाटतेय. या व्हिडिओत ती तिची मुलगी राबियाला कुशी घेऊन आठवणीत रमलेली दिसतेय.

Swara Bhasker Diwali
दिवाळीच्या आठवणीत रमली स्वरा भास्कर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 12:50 PM IST

मुंबई - Swara Bhasker Diwali : दिवाळी सण जवळ आलाय आणि बॉलिवूड सेलेब्रिटींनी उत्सवाचा नंद साजरा करायला सुरुवात केलीय. अनेक निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आणि प्रॉडक्शन हाऊसेस दिवाळी सेलेब्रिशनच्या पार्ट्या आयोजित करत असतात आणि या ठिकाणी तारे तारकांची मांदियाळी पाहायला मिळते. दरम्यान, स्वरा भास्कर आपल्या लेकीच्या संगोपनात गुंतली आहे. तिनं तिच्या प्रसूतीनंतरच्या जीवनाची एक झलक शेअर केली आहे आणि दिवाळीच्या वेळी ती कशी कपडे घालायची, कशी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायची याची आठवण सांगितलीय.

स्वरा भास्करनं इंस्टाग्रामवर भूतकाळातील तिच्या दिवाळीच्या आठवणी जपणारी एक झलक शेअर केलीय. व्हिडिओमध्ये ती तिच्या पलंगावर पहुडली आहे आणि तिची लहान मुलगी राबिया तिच्या कुशीत आहे. ती फोनवर आपले जुने फोटो पाहताना आठवणीत हरवून जाते. तिला आपल्या हातून आनंदाचे हे क्षण सुटणार तर नाही याची चिंता वाटतेय. दिवाळीच्या सणानिमित्त तिनं परिधान केलेल्या उत्सवातील पारंपरिक पोशाखाची झलक तिनं दाखवलीय. यामध्ये ती अतिशय आनंदात दिसत असून पार्श्वभूमीवर झुमका गिरा रे हे गाणे वाजताना ऐकू येतंय. या मनोरंजक व्हिडिओच्या शेवटी स्वरा तिच्या नवजात मुलाकडे पाहते आणि विचार करते, "आआआआआह... चांगली धाव आहे!"

अभिनेत्री स्वरा हिने याच वर्षी जानेवारी महिन्यात समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता फहाद अहमदसोबत लग्न केले. या दोघांनी 6 जानेवारी रोजी विशेष विवाह कायद्यांतर्गत त्यांच्या लग्नाची कायदेशीर नोंदणी केली. मार्चमध्ये या जोडप्याने भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे भव्य लग्नाचे रिसेप्शन आयोजित केलं होतं.

स्वरा भास्कर आणि तिचा जोडीदार फहाद अहमद यांना 23 सप्टेंबर रोजी मुलगी झाली. त्यांनी तिचं नाव राबिया असं ठेवलंय. स्वरा भास्करनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बाळासोबतचे काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. तिनं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'एक प्रार्थना ऐकली, आशीर्वाद देण्यात आला, एक गाणे एक रहस्यमय सत्य, आमची मुलगी राबिया हिचा जन्म २३ सप्टेंबर २०२३ रोजी झाला. हे पूर्णपणे नवीन जग आहे... तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद'.

हेही वाचा -

1. Diwali Party : चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांच्या पार्टीत 'या' स्टार्सनं लावली हजेरी

2. Ankita Lokhande Trolled : 'बिग बॉस 17'मध्ये सुशांत सिंगबद्दल बोलताना अंकिता लोखंडे झाली भावूक

3. Vishal Gurnani Diwali Bash : एक्स रोहमन शॉलसोबत सुष्मिता सेनच्या आगमनानं चाहत्यांच्या नजरा विस्फारल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.