ETV Bharat / entertainment

Neha Kakkar birthday : नेहा कक्कडने आई वडिलांसोबत साजरा केला ३५ वा वाढदिवस - नेहा कक्कडने तिचा 35 वा वाढदिवस

लोकप्रिय गायिका नेहा कक्कड आज आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Neha Kakkar birthday
नेहा कक्कडने आई वडिलांसोबत साजरा केला ३५ वा वाढदिवस
author img

By

Published : Jun 6, 2023, 6:39 PM IST

Updated : Jun 6, 2023, 7:00 PM IST

मुंबई - लोकप्रिय भारतीय गायिका नेहा कक्कडने तिचा 35 वा वाढदिवस आई वडिल आणि प्रिय लोकांच्या सानिध्यात आनंदात साजरा केला. मंगळवारी नेहा कक्कडने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या वाढदिवसाची सुरुवात बारापासूनच प्रिय व्यक्तींच्या सहवासात सुरू झाल्याचे तिने सांगितले. लो-की बर्थडे बॅशसाठी गायिका नेहा हिने तिच्या 35व्या वाढदिवसाला ऑल-ब्लॅक कॅज्युअल लुक निवडला होता. तिने आपले केस मोकळे आणि सरळ ठेवले होते.

तिचे वडील ऋषिकेश कक्कर यांनी मॅचिंग पॅन्टसह पांढरा टी-शर्ट घातलेला होता. दुसरीकडे तिची आई निती कक्कर हिने काळ्या रंगाचा नाईटसूट परिधान केला होता. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या फोटोत नेहा आणि तिचे आई वडील एका सजवलेल्या खोलीत हसताना आणि नृत्य करताना दिसत आहेत.दुसऱ्या फोटोत तिचे वडील ऋषिकेश नेहाला केक खाऊ घालताना दिसतात. नेहाने हे फोटो शेअर केल्यानंतर तिच्यावर वाढदिवस शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. तिचे चाहते तिला भरभरुन प्रेम आणि सदिच्छा पाठवत आहेत. पंजाबी गायक अखिलने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या. तिची बहीण आणि बॉलीवूड गायक सोनू कक्कडनेही तिला आशीर्वादपर संदेश दिला. लोकप्रिय गायक टोनी कक्कडनेही तिच्या बहिणीला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या इंस्टाग्रामवर बहिणीसोबतचे थ्रोबॅक फोटो पोस्ट केले आणि शुभेच्छा दिल्या.

गायिका नेहा कक्कड तिच्या विशिष्ट आणि सुमधुर आवाजासाठी ओळखली जाते आणि ती बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. तिने अनेक बॉलीवूड आणि पंजाबी चित्रपट तसेच म्युझिक व्हिडिओंसाठी गायन केले आहे. नेहाने अगदी लहान वयातच धार्मिक कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यास सुरुवात केली होती. 2005 मध्ये तिने इंडियन आयडॉल शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. मीराबाई नॉट आउट या चित्रपटातून तिने कोरस सिंगर म्हणून गायन करत बॉलिवूडमध्ये प्रेवश केला होता. कॉकटेल चित्रपटातील सेकंड हँड जवानी या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. इंडियन आयडॉलसह अनेक रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षक म्हणून झळकली आहे.

नेहाने तिच्या जवळपास 15 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चार्ट-टॉपिंग हिट्स गाणी दिली आहेत. नेहाने नुकतेच तिचे 'बलेंसियागा' हे गाणे रिलीज केले ज्यामध्ये तिने भाऊ टोनी कक्कड सोबत परफॉर्म केले. हे गाणे खूप हिट झाले आणि यूट्यूबवर 5 दिवसात 7+ व्ह्यूज मिळाले.

हेही वाचा -

१. Sidharth Malhotra Reeact : कियारा अडवाणीच्या 'सत्यप्रेम की कथा'च्या ट्रेलरवर सिद्धार्थ मल्होत्राने दिली प्रतिक्रिया

२. Ileana D'cruz : बेबीमून एन्जॉय करत आहे इलियाना डिक्रूज, बिकिनीने फ्लॉन्ट केले बेबी बंप

३. Sunil Dutt Birth Anniversary : बस कंडक्टर ते लोकप्रिय सिने आणि जन नायकापर्यंतचा सुनिल दत्त यांचा प्रवास

Last Updated : Jun 6, 2023, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.