ETV Bharat / entertainment

Rishi Kapoor Death Anniversary : ऋषी कपूर यांची ४५ वर्षांची साथ तुटल्याने नीतू कपूर यांना वेदना - ऋषी कपूर पुण्यतिथी

30 एप्रिलला अभिनेते ऋषी कपूर यांची दुसरी पुण्यतिथी आहे. या दु:खाच्या काळात पतीच्या आठवणीने नीतू कपूर भावूक झाल्या. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.

नीतू कपूर व ऋषी कपूर
नीतू कपूर व ऋषी कपूर
author img

By

Published : Apr 30, 2022, 1:00 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज ऋषी कपूर यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. उपचारादरम्यान 30 एप्रिल 2020 रोजी अभिनेत्याचा मृत्यू झाला होता. ऋषी यांच्या निधनाची बातमी देशभर पोहोचली तेव्हा चाहत्यांमध्ये अश्रूंचा महापूर आला. अचानकपणे ऋषी कपूर इतक्या लवकर अलविदा करतील यावर कोणालाच विश्वास बसत नव्हता. ऋषी कपूर यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले होते. अशा परिस्थितीत ऋषी यांची पत्नी नीतू कपूर यांनी स्वतःला कसे हाताळले असेल, हे फक्त त्यांच्याच मनाला माहिती असेल.

30 एप्रिलला अभिनेते ऋषी कपूर यांची दुसरी पुण्यतिथी आहे. या दु:खाच्या काळात पतीच्या आठवणीने नीतू कपूर भावूक झाल्या. एका शोमध्ये ऋषीची आठवणीने त्या रडताना दिसल्या. या संदर्भात ज्येष्ठ अभिनेत्रीने एक पोस्ट करत आपल्या दुःखी मनाने काही धक्कादायक गोष्टी लिहिल्या आहेत.

नीतूने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, 'ऋषीजींना सोडून आज दोन वर्षे झाली आहेत... ४५ वर्षांचा जोडीदार गमावणे कठीण आणि वेदनादायी होते. मानसिकदृष्ट्या स्वतःला गुंतवून ठेवणे हाच त्यावेळी माझे हृदय बरे करण्याचा एकमेव मार्ग होता. चित्रपट आणि टेलिव्हिजनने माझी काळजी घेतली, ऋषीजी तुमची नेहमी आठवण राहील, तुम्ही नेहमीच सर्वांच्या हृदयात राहाल.

1980 मध्ये ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांनी लग्न केले आणि सेटल झाले. लग्नाआधी ऋषी आणि नीतू सिंग रिलेशनशिपमध्ये होते आणि हा प्रेमविवाह होता. या लग्नापासून या जोडप्याला रिद्धिमा आणि रणबीर कपूर ही दोन मुले झाली.

गेल्या 14 एप्रिलला नीतू कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरने त्याची मैत्रीण आलिया भट्टसोबत लग्न केले. नीतू सिंहने लग्नानंतर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये ती मुलगा रणबीर कपूरसोबत उभी होती.

हा फोटो शेअर करत नीतू कपूरने लिहिले, 'कपूर साहेब तुमचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ऋषी कपूर यांना त्यांचा मुलगा रणबीर कपूरचे लग्न पाहण्याची खूप इच्छा होती, परंतु वेळेला काही वेगळेच मंजूर होते.

हेही वाचा - ऋषी कपूर यांची दुसरी पुण्यतिथी: बॉलिवूडच्या राजपुत्राचा चित्र प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.