मुंबई - हिंदी सिनेसृष्टीत अष्टपैलू भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नेहमीच संघर्षातून पारजून निघाला आहे. करियरच्या सुरुवातीपासून सुरू असलेला त्याचा संघर्ष आजही वेगळ्या अर्थाने स्वःआयुष्यात जारी आहे. सध्या त्याच्यापासून त्याची पत्नी दुरावली आहे. भाऊबंदकीचा शाप त्यालाही लागलाय. अनेक वादग्रस्त आरोपांना व न्यायालयीन लढाईला तो सध्या सामोरे जाणारा नवाजुद्दीन १९ मे रोजी आपला ४९ वा वाढदिवस साजरा करतोय.
अभिनय कारकीर्दीची खडतर सुरुवात - नवाजुद्दीनने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात १९९९ साली प्रदर्शित झालेल्या सरफरोश चित्रपटातील एका छोट्याशा भूमिकेने केली होती. शूल या सिनेमात तर त्याच्या वाट्याला अतिशय दुर्लक्षित अशी भूमिका आली. पण तो प्रॉडक्शन हाऊसच्या चक्करा मारणे थांबवत नव्हता. २००३ मध्ये आलेल्या मुन्ना भाई एमबीबीएस सिनेमात त्याने एका मामुली पाकिटमारची भूमिका केली. पण या सर्व भूमिका छोट्या होत्या पण त्यातील नवाजची छबी अजूनही आपण विसरु शकत नाही. २०१२ मध्ये अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपट मालिकेतील त्याच्या व्यक्तीरेखेने प्रेक्षकांसह समीक्षकांचे लक्ष वेधले आणि त्याच्या लोकप्रियतेला आधार तयार झाला. आजच्या घडीला नवाझुद्दीनला हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखले जाते.
गँग्स ऑफ वासेपुरनंतर गाडी रुळावर आली - हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या प्रवासाबद्दल बोलताना एकदा नवाझुद्दीनने सांगितले होते की, तो सुरुवातीची १२ वर्षे काम मिळण्यासाठी झगडत होता. २०१२ मध्ये 'गँग्स ऑफ वासेपुर' आणि त्यानंतर आलेल्या 'कहानी', 'तलाश' 'आणि इतर चित्रपटांनी त्याचा वनवास संपवला. यातून तो बरेच काही शिकला आणि त्याचा उपयोग त्याला पुढच्या कारकिर्दीमध्ये झाला.
अष्टपैलू अभिनेता - नवाजुद्दीनने नेहमीच आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. आजवर त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिका तो अक्षरशः जगलाय. लंच बॉक्समधील शेख, बजरंगी भाईजनमधील चाँद नवाब, माँझी द माऊंटन मॅनमधील दशरथ माँझी, मंटोमधील सआदत हसन मंटो असो की सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडे किंवा ठाकरेमधील बाळासाहेब ठाकरेंची भूमिका असो, तो प्रत्येकवेळी पडद्यावर नवा जगलाय. हिरोपंथी चित्रपटात लैला हे व्यक्तीरेखा साकारलयानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी आगामी 'हड्डी' या चित्रपटात एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे.
ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार नवाज - एखादी भूमिका करताना त्याचा बारकाईने अभ्यास व निरीक्षण करण्याची त्याने नेहमीच पद्धत अवलंबली आहे. आता 'हड्डीच्या चित्रीकरणापूर्वी ते ट्रान्सजेंडर समुदायामध्ये राहत होतो. यात त्याच्या लक्षता आले की ते स्वतःला स्त्रियांसारखे ठेवतात. त्यांना एक स्त्री व्हायचे आहे आणि ते त्यांचे आयुष्य पूर्ण करणारी गोष्ट मानतात. भूमिकेसाठी त्याने या गोष्टी लक्षात ठेवल्या. त्याला नेहमी वाटायचं की तो एक स्त्री पात्र साकारत आहे. या भूमिकासाठी मेकअपसह तयार व्हायला नवाजुद्दीनला 3 तास लागायचे. मेकअप करताच त्याला स्वतःमध्ये झालेला बदल जाणवायचा. तुम्ही त्याला जेव्हा चित्रपटात साडी नेसलेली पाहाल, तेव्हा हे कळेल की त्याने ती अगदी स्त्रीने परिधान केली पाहिजे तशीच नेसली आहे.
हेही वाचा - Cannes 2023 Aishwarya Rai Bachchan : कान्समध्ये ऐश्वर्या राय बच्चनचा लूक पाहून चाहते थक्क