ETV Bharat / entertainment

National film award 2022 :आशा पारखे यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, मराठी कलावंतांचा दिल्लीत बाजी - गोदावरी किशोर कदम

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कारान प्रदान करण्यात आला. पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगण याला देण्यात आला. तर ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात मराठी कलावंतांनी अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.

National film award 2022
National film award 2022
author img

By

Published : Oct 1, 2022, 10:01 AM IST

नवी दिल्ली - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा काल दिल्लीत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी अभिनेत्री आशा पारेख यांना सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल २०२० या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कारान प्रदान करण्यात आला. पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगण याला देण्यात आला. सूरराय पोत्रू चित्रपटासाठी अभिनेता सुर्या याचीही गौरव करण्यात आला.

याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. किशोर कदम यांना (गोदाकाठ, अवांछित) या चित्रपटातील भूमिकेसाठी स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात मराठी कलावंतांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उठवला आहे. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर याच्या प्रमुख भूमिका असेलल्या 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॉन फिचर्स फिल्म या विभागात कुंकूमार्चन या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यूचा पुरस्कार जाहीर झाला. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी मराठी चित्रपट 'फनरल'ची निवड करण्यात आली.

  • Congratulations to all the awardees at the 68th National Film Awards!

    Time and again, cinema has proved to be the universal language that unites us.

    Cinema is poetry in pictures mirroring the magic, marvel and madness of all that which makes us feel alive and human! pic.twitter.com/akLblM3Ims

    — Anurag Thakur (@ianuragthakur) September 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'तान्हाजी-द अनसंग वॉरिअर' या चित्रपटासाठी दिग्दर्शक ओम राऊतला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जून या चित्रपटातील अभिनयासाठी अभिनेता सिद्धार्थ मेनन याला स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. मी वसंतराव या मराठी चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार देण्यात आला.

'सुमी' हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला आहे. या चित्रपटातील दिव्येश इंदुलकर व मराठी चित्रपट टक टकमधील अनिश गोसावी या दोन कलाकारांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला.

याशिवाय अनिश गोसावी (टक टक) तसेच आकांशा पिंगळे व दिव्येश इंदुलकर (सुमी) यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला.

हेही वाचा - 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा, आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.