मुंबई - मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने मंगळवारी जाहीर केले की राष्ट्रीय सिनेमा दिवस ( National Cinema Day ) 16 सप्टेंबरला नव्हे तर 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त, PVR, INOX, Cinepolis, Carnival आणि Delight यासह देशभरातील 4,000 हून अधिक स्क्रीनवर 75 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
एका निवेदनात एमएआयने म्हटले आहे की, अनेक भागधारकांच्या विनंतीनुसार आणि लोकांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी, राष्ट्रीय चित्रपट दिन 16 सप्टेंबरला नव्हे तर 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल. यापूर्वी, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने घोषित केले होते की 16 सप्टेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाईल.
-
The National Cinema Day was previously announced to be held on 16th September, however, on request from various stake holders and in order to maximize participation, it would now be held on 23rd September #NationalCinemaDay2022 #Sep23 pic.twitter.com/c5DeDCYaMD
— Multiplex Association Of India (@MAofIndia) September 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The National Cinema Day was previously announced to be held on 16th September, however, on request from various stake holders and in order to maximize participation, it would now be held on 23rd September #NationalCinemaDay2022 #Sep23 pic.twitter.com/c5DeDCYaMD
— Multiplex Association Of India (@MAofIndia) September 13, 2022The National Cinema Day was previously announced to be held on 16th September, however, on request from various stake holders and in order to maximize participation, it would now be held on 23rd September #NationalCinemaDay2022 #Sep23 pic.twitter.com/c5DeDCYaMD
— Multiplex Association Of India (@MAofIndia) September 13, 2022
अशा प्रकारे यापूर्वी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जात नव्हता. यंदा हा ट्रेंड नव्याने सुरू झाला आहे. कोविडमुळे थिएटर्स दोन वर्षे बंद पडलेली होती. दोन वर्षानंतर नाट्यगृह पुन्हा सुरू झाल्याच्या आनंदात हा दिवस साजरा केला जात आहे. चित्रपटगृहांनी केलेली ही घोषणा लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात न गेलेल्या प्रेक्षकांना परत आणण्यासाठी एक मोठे पाऊल आहे.
एमएआयने एका निवेदनात दावा केला होता की भारतामध्ये देशांतर्गत चित्रपट उद्योगाची भरभराट होत आहे आणि जगभरातील चित्रपट व्यवसायात सर्वात वेगाने पुनर्प्राप्ती झाली आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सिनेमांनी चांगली कामगिरी केली आहे. KGF Chapter 2, RRR, विक्रम, भूल भुलैया 2, Doctor Strange आणि Top Gun: Maverick सारखे चित्रपट या तिमाहीत प्रदर्शित झाले.
राष्ट्रीय सिनेमा दिना निमित्त २३ सप्टेंबर रोजी 75 रुपयांचे हे तिकीट त्या आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्व मुख्य प्रवाहातील फॉर्मेट आणि चित्रपटांवर लागू होईल.
हेही वाचा - फ्रान्सच्या न्यू वेव्ह सिनेमाचे जनक जीन लुक गोडार्ड यांचे मंगळवारी वयाच्या 91 व्या वर्षी निधन